Breaking News

डाॅ. राजेश श्रीमंतराव तांदळे एक आदर्श व्यक्तिमत्व !

हे नाव घेतले की डोळ्यासमोर उभे राहते ते एक करारी, जिद्दी आणि सेवाभावी वृत्तीने काम करणारे एक आदर्श व्यक्तीमत्व ..! सन 1998 -1999 साली अनावधानाने शिरूर कासार प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी या पदावर रूजू झाल्यानंतर डाॅ. तांदळे साहेबांनी शिरूर तालुक्याला कधी आपलंस केल कळलेच नाही. शिरूर तालुक्यात अनेक अधिकारी आले आणि गेले परंतु सर्वात जास्त काळ राहिलेले आणि आपल्या कामामध्ये सतत आघाडीवर आणि सर्व सामान्य माणसाशी नाळ असलेले अधिकारी म्हणाल तर डाॅ. साहेबांचेच नाव घ्यावे लागेल. 

शासकीय अधिकारी म्हणून काम करत असताना सर्वसामान्य जनतेशी नाळ जोडली गेली आणि पुढे मग एक एक करत अनेक सामाजिक उपक्रम हाती घेतले आणि शिरूर तालुक्याचे ताईत बनले. कोणती ही एखादी कमतरता किंवा उणीव दिसली कि, त्या विषयावर अभ्यास करून एक चांगला उपक्रम तयार करून राबवयाचा हि डाॅ. तांदळे सरांची खासियत. त्याचे किती तरी उदाहरणं देता येतील. 

सन 2003 साली सिध्धेश्वर संस्थान शिरूर कासार चे मठाधिपती शांतिबृम्ह वै.ह.भ.प. आबादेव महाराज हे आजारी पडले. त्यांना औषधोपचार करण्यासाठी तांदळे सर हे मंदिरावर गेले. तेथे मंदिर परिसराची दुरावस्था आणि त्यावर असणारे अतिक्रमण पाहिले. 3 एक्कर असलेली मंदिर परिसर 20 - 30 फूट उंचीच्या येडया बाभळीच्या झाडांनी वेढलेला होता. त्यामुळे सूर्यप्रकाश देखील जमीनीवर येत नव्हता. हि दुरावस्था पाहून लगेच मनाचा निर्धार केला कि सिध्धेश्वराचे हे  मंदिर आणी परिसर सुशोभित करून शिरूरच्या वैभवामधे भर टाकायची आणि कामाला सुरुवात केली. त्यावेळी शिरूर परिसरात JCB उपलब्ध नव्हते मग मित्र बाळासाहेब परजणे यांच्या मदतीने सोनई हून JCB आणून काम चालू केले. 98 तास काम चाललं. काही लोकांनी दिलेली देणगी आणि बाकी रक्कम स्वतः देत पूर्ण लेव्हल करून घेतली. याकामी दत्ता पाटील गाडेकर यांची पण खूप मदत झाली. या सर्व कामामध्ये श्री. अशोक काका गायकवाड आणी शासकीय गोडाऊन मध्ये काम करणारे सर्व हमाल बांधव यांची हि खूप मदत झाली  परिसरातील सर्व ट्रॅक्टर चालकांनी पैसे न घेता फक्त डिझेलवर काम केले. पुढे सन 2011 मधे  मंदिराच्यालगत असणारी अकबरशेठ पठाण यांची 18 गुंठे जागा लोकवर्गणीतून विकत घेतली जेणेकरून मंदिराची जागा चौरस झाली आणि मंदिराला संत आबादेव महाराज रोडपासून 25 फूट रूंद रस्ता मिळाला.

 


तसेच माजी आमदार सलीमभाई कडून 1 आणि मा. आमदार सुनिल धांडे सरांकडून 1 असे दोन सभागृह, मा.मंत्री जयदत्त आण्णा क्षीरसागर यांच्या कडून 19 लक्ष रू. ची सिंदफना पलीकडील बाजूला संरक्षक भिंत, मा. आमदार सूरेश आण्णा धस यांच्या कडून तिर्थक्षेत्र विकास योजने अंतर्गत 25 लक्ष रू. चे कंपाउंड वाल आणि भक्त निवास तसेच पाणीपुरवठा योजनेला (विहिर आणि पाईपलाईना) निधी मिळवला. या विहिरीसाठी मा.सभापती बाबूरावजी केदार यांनी डाॅ. साहेबांच्या शब्दावर जागा दान दिली. तसेच श्री. विनोदशेठ डुंगरवाल यांनी 3.5 लक्ष किमतीचे भव्य असे प्रवेशद्वार बांधून दिले. हे सर्व करत असताना शिरूर परिसरातील अनेक गावांमध्ये शेतकरी बांधव जुन्या दगडी चिर्रयाने बांधलेल्या परंतु ढासळू लागलेल्या विहिरीचे चिरे काढून सिमेंट  काँक्रीट चे कडे टाकत होते. अशा सर्व गावांमध्ये जाऊन तो चिरा मोफत मिळवला आणि ट्रँक्टरने शिरूर ला आणला आणि सिध्धेश्वराचा समोरचा सुंदर असा घाट बांधला. मंदिराला कोणतही उत्पन्न नव्हते अशा परिस्थितीत 2003 पासून लकी ड्रॉ च्या माध्यमातून निधी उभा केला. त्यावेळी लकी ड्रॉ फारसा कोणाला माहित नव्हता. नंतर याच लकी ड्रॉ ची प्रेरणा घेवून शिरूर तालुक्यातील पिंपळनेर, भालगाव, मानूर, लोणी, ब्रम्हनाथ येळंब, कान्होबाचीवाडी, गोमळवाडा, झापेवाडी अशा एकूण 20 ते 25 गावांमध्ये मंदिराचे जिर्णोध्दार झाले. हि एक खूप मोठी चळवळ तयार झाली. सिध्धेश्वराचे काम केल्यामुळे 2004 मधे तांदळे सरांची बदली देखील अकोला जिल्ह्यात करण्यात आली. त्यावेळेस बदली रद्द करण्यासाठी शिरूर तालुक्यातील जनता उत्स्फूर्तपणे रस्त्यावर उतरली. त्यावेळी सरांनी ठरवलं की सर्वसामान्य लोक आपल्यासाठी रस्त्यावर उतरत असतील तर शिरूर तालुक्यात राहूनच त्यांच्या साठी काहीतरी केल पाहिजे पुढे काही कारणास्तव सिध्धेश्वराचे काम सोडावे लागले. परंतु आजही सिध्धेश्वराचा केलेला विकास आणि त्यासाठी त्यांनी घेतलेले कष्ट कोणीही नाकारू शकत नाही आणि विसरू देखील शकत नाही.  

सिध्धेश्वराचे काम सोडावे लागल्या नंतर मन स्वस्थ बसू देत नव्हते आणि त्याचवेळी एक दिवस बीड ला जात असताना दगडवाडी जवळ टेकडीवर  जीर्ण अवस्थेत असलेल्या जगदंबादेवी ( डोंगरदेवी ) मंदिराकडे लक्ष गेलं. हे साडे चारशे वर्षांपूर्वी बांधलेले मंदिर निजाम कालावधी मध्ये रायमोहाच्या किल्ल्यावरून डागलेल्या तोफगोळयांच्या मार्या मधे भग्न झालेले होते. दुसरृयाच दिवशी पोकलेनने कामाला सुरुवात केली. जवळपास सव्वा कोटी रुपये खर्चाच्या   बन्सी पहाडपूर या दगडामध्ये कोरीव नक्षीकाम असून जवळपास 60% काम  लकी ड्रॉ च्या माध्यमातून पूर्ण केले आहे. उर्वरित काम लवकरच पूर्ण होतेय. या. मंदिराभोवती थोडी जागा कमी होती. दरम्यानच्या काळात पायथ्याला रेल्वेचे खोदकाम सुरू झाले. त्यावेळी सरांनी रेल्वे चे काँन्ट्रॅक्टर श्री. श्रीधरजी नायडू साहेब यांची भेट घेतली व खोदकाम करून निघणार्या मटेरियलचा  देवीच्या मूळ टेकडीच्या भोवती भराव करून देण्याची विनंती केली. नायडू साहेबांनी भरावाच काम मोफत करून दिल. सदर काम हे 24 तास सतत 1वर्ष चालले. त्याठिकाणी एकूण 66000 हायवा ट्रक मटेरियल बसले. आता या मंदिर परिसराला चक्कर मारली तर 1 कि. मी. चा राऊंड तयार झाला आहे. नायडू साहेबांनी मोफत करून दिलेल्या या कामाची किंमत काढली तर 20 कोटींच्या घरात जाते. मागील वर्षी  आमदार धस आण्णांच्या माध्यमातून तिर्थक्षेत्र विकास योजने अंतर्गत 20 लक्ष रू. चा  निधी ( पार्किंग आणि पथदिवे ) सरांनी मिळवला. हे भव्यदिव्य मंदिर आता बीड जिल्ह्यात प्रति मोहटादेवी म्हणून ओळखले जात आहे. याठिकाणी नवरात्रामधे किर्तन महोत्सव आयोजित केला जातो ज्यामध्ये महाराष्ट्रातील नामवंत किर्तनकार हजेरी लावतात. दसर्याच्या दिवशी होणार्या रावनदहनाला शिरूर तसेच बीड परिसरातून हजारो भाविक येतात. मागील वर्षापासून तर बालकांसाठी आनंदनगरी सुध्दा सुरू केली आहे.

तांदळे सरांनी 2010 पासून संत आबादेव महाराज स्मॄती प्रित्यर्थ पाणपोई चालू करून उन्हाळ्यात शिरूरकरांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली. त्याला कारणही तसंच घडलं. एका 5 वर्षांच्या पारधी समाजातील लहान मुलगा पाणी पिण्यासाठी एका हाॅटेल मध्ये जायचा. त्यावेळी पाणी टंचाई मुळे हाॅटेल मध्ये  चहा घेतला तरच पाणी देत असत. यामुळे त्या बालकाला हाॅटेल वाला पाणी देत नव्हता. हा प्रसंग पाहून त्या बालकाला पाणी तर दिलच परंतु शिरूर मधील प्रत्येक चौकात 1अशा चार पाणपोई मोफत चालू केल्या. सन 2011 च्या जनगणनेनुसार शिरूर तालुक्यातील मुलींचा जन्मदर 778/1000 मुलांनमागे ईतका कमी झाला होता आणि शिरूर तालुका रेड झोन मध्ये आला होता. परंतु सरांच्या नियोजनबध्द कामगिरी मुळे रेड झोन मधून बाहेर पडला.

तांदळे सरांना स्पर्धा परिक्षा उत्तीर्ण झालेल्या किंवा विविध क्षेत्रात नाव कमावलेल्या युवकांचे कौतुक करण्याची आवड आहे. असेच एकदा कोळवाडी येथील युवक श्री. विजय नेटके UPSC परिक्षा उत्तीर्ण झाले. त्यांचा सरांनी सत्कार केला आणि चर्चा करत असताना नेटके साहेबांच्या बोलण्यातून अस लक्षात आलं कि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनमधे गुणवत्ता आहे पण इंग्रजी भाषेत प्रेझेंट करताना अडचणी येतात. तेव्हा इंग्रजी माध्यमातून चांगल्या प्रकारे शिक्षण घेता यावे म्हणून " न्यू स्वामी समर्थ  इंग्लिश स्कूल " ची सुरु केली. या शाळेमध्ये 25% RTE व्यतिरिक्त  जी मुले अनाथ आहेत त्यांना *संत आबादेव महाराज पालक योजने अंतर्गत  मोफत शिक्षण तसेच शालेय साहित्य पुरवले जाते. 

सन 2013 पासून " न्यू स्वामी समर्थ इंग्लिश स्कूल " च्या स्नेहसंमेलन कार्यक्रमात सिध्धेश्वर प्रतिष्ठान च्या माध्यमातून शिरूर तालुक्यातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणार्या तीन व्यक्ती निवडून त्यांना संत आबादेव महाराज स्मॄती पुरस्कार देऊन गौरवण्यात येते. त्याच पैकी एक असणारे  100 पेक्षा जास्त  भाकड गाई सांभाळणारे दहिवंडी गावचे शब्बीर मामू ज्यांना 2018 ला पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात आले. 

11 एप्रिल हा तांदळे सरांचा वाढदिवस. आणि बघा काय दुर्मिळ योगायोग सरांच्या दोन्ही मुलांचा ( अमर्त्य आणि अमित ) जन्मदिवस देखील 11 एप्रिलच  या दुर्मिळ योगाबद्दल सरांनी एकदा सांगितले होते की ते पहिल्या पासून चाकरवाडीला दर्शनासाठी जात अ सत आणि वाढदिवसाच्या दिवशी तर नक्कीच जात असत. दोन्ही मुलांच्या जन्माची बातमी देखील माऊली च्या समाधीचे दर्शन घेतानाच समजली आणि विशेष म्हणजे माऊलींचा जन्मदिवस देखील 11 एप्रिलच. खरोखरच नावाप्रमाने वास्तविक जीवनामध्ये श्रीमंताचा राजा असणार्या या व्यक्तिमत्वास व त्याच्या दोन्ही मुलांना ( अमर्त्य आणि अमित) वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा जिवेत शरदः शतम् 

No comments