मुला पाठोपाठ तिसऱ्या दिवशी वडिलांनीही प्राण सोडले
गौतम बचुटे । केज
मुलाच्या पाठोपाठ त्याच्या विरहाने वृद्ध वडिलांनीही प्राण सोडल्याची दुःखद घटना केज तालुक्यात घडली आहे.
या बाबतची माहिती अशी की, साळेगाव ता. केज येथील ऊसतोड मजूर वाल्मिक गालफाडे यांचे दि. ३१ मार्च रोजी कोरोनाची लागण झाल्यामुळे उपचारा दरम्यान स्वामी रामानंद तिर्थ शासकीय रुग्णालयात निधन झाले होते. मुलगा वाल्मिकचे वडील नारायण गालफाडे हे मागील काही महिन्यांपासून आजारी असल्याने त्यांची शुश्रूषा वाल्मिक गालफाडे करीत होते. त्यातच वाल्मिक गालफाडे कोरोनाची लागण झाली व त्यांचे निधन झाल्याची माहिती त्याचे वडील नारायण गालफाडे यांना झाली. त्या विरहाने आणि कोरोना बाधित मुलाच्या संपर्कात असल्यामुळे त्यांनाही लागण झाली असावी. त्यामुळे दि. ३ एप्रिल शनिवार रोजी सकाळी ९:०० वा. निधन झाले. नारायण गालफाडे हे सांप्रदायिक वृत्तीचे होते. त्यांच्या पश्चात विधवा सून, नातू, मुलगी व जावई असा परिवार आहे.
साळेगाव येथे या पंधरा दिवसात चार मृत्यू झाले आहेत. त्यातील
१)प्रभाकर गालफाडे (मत्यु दि. २४ मार्च) आणि
२) वाल्मिक गालफाडे (मत्यु दि. ३१ मार्च) यांचे कोरोना असल्याचे निदान झाले होते. तर
३) कस्तुरबाई गालफाडे (मत्यु दि. २२ मार्च) आणि
४) नारायण गालफाडे (मत्यु दि. ३ एप्रिल)
यांनी कोरोना तपासणी केली नव्हती पण त्यांना लक्षणे जाणवत होती.
No comments