Breaking News

मुहम्मदिया कॉलनीतील रहिवाशांना मिळणार आता आठ दिवसाला पाणी - सय्यद इलयास


पाणीपुरवठा सभापती सय्यद इलयास व युवा नेते सय्यद इलयास यांचे नागरिकांनी मानले आभार ! 

बीड :  गेल्या अनेक वर्षांपासुन मुहम्मदिया कॉलनी येथे पंधरा ते वीस दिवसाआड पाणी पुरवठा करण्यात येत होता. यामुळे येथील नागरिकांना पाण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत असायची. ही बाब एआयएमआयएम पक्षाचे युवानेते सय्यद इलयास हे अनेक वर्षांपासुन जिल्हाधिकारी कार्यालय व बीड नगर परिषद कडे निवेदनाच्या माध्यमातून मांडत होते. यासाठी सन 2015 पासून आतापर्यंत  एकूण 17 निवेदने  या दोन्ही कार्यालयांमध्ये  दिली आहे. 

परंतु याकडे नगरपरिषदेच्या चपराश्या पासून ते मुख्याधिकारी पर्यंत आणि या प्रभागातील आजी-माजी नगरसेवकांपासून ते नगराध्यक्षांपर्यंत कुणीही लक्ष घालून पाण्याची समस्या दूर केली नाही. मात्र यावेळी काही दिवसांपूर्वी पाणीपुरवठा सभापती पदावर वर्णी लागताच नगरसेवक सय्यद इलयास यांच्याकडे युवा नेते सय्यद इलयास यांनी या प्रभागातील पाण्याची समस्या निदर्शनास आणून देताच पाणीपुरवठा सभापतींनी नगराध्यक्ष, मुख्याधिकारी, अभियंता यांच्याकडे याविषयी पाठपुरावा सुरू केला. आणि आवश्यक असलेले हे कार्य अल्पावधीतच करून घेतले. यामुळे आता लवकरच मुहम्मदिया कॉलनी वासियांना आठ दिवसाआड पिण्याचे पाणी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असून या मुद्द्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासुन सातत्याने पाठपुरावा करणारे युवा नेते सय्यद इलयास आणि पाणीपुरवठा सभापती सय्यद इलयास यांचा येथील नागरिकांनी ह्रदयी सत्कार केला. 

या सत्कार प्रसंगी बोलताना पाणीपुरवठा सभापती सय्यद इलयास यांनी म्हटले की, या भागात पाण्याची एवढी गंभीर समस्या होती हे जेव्हा मला सय्यद इलयास यांच्याकडून समजले तेव्हा या प्रभागात येऊन मी त्यांच्यासोबत सर्वे केला त्यांनी केलेले अध्ययन आणि मार्गदर्शन एवढे वस्तुस्थिती दर्शवणारे होते की, हे कार्य करताना आमच्या बीड नगर परिषदेचे अभियंता आणि कामगारांना कोणतीही अडचण आली नाही, त्यांचे काम सोपे झाले. म्हणून या कामाच्या श्रेया मध्ये इलयास भाईंचा सिंहाचा वाटा आहे. यावर आपले मनोगत व्यक्त करताना युवा नेते सय्यद इलियास यांनी म्हटले की, मी जरी अनेक वर्षांपासून येथील पाणीपुरवठ्यासंबंधी पाठपुरावा करीत असलो तरी त्याला यश काही येत नव्हते. परंतु दर्दी नगरसेवक असलेले सय्यद इलयास हे पाणीपुरवठा सभापती बनताच त्यांच्याकडे सुद्धा प्रयत्न म्हणून मी पाठपुरावा सुरू केला. आणि त्यांनी आपल्या प्रभागातील पाण्याची समस्या अवघ्या काही दिवसात दूर केली. याबद्दल मी आपल्या सर्वांकडून त्यांचे आभार व्यक्त करतो. शेवटी नागरिकांनीही दोघांचे आभार व्यक्त करून सत्कार समारंभाचा समारोप केला.

No comments