Breaking News

भाऊच झाला बहिणीचा वैरी : विधवा बहिणीचा केला मित्राच्या मदतीने तीक्ष्ण हत्याराने खून !

गौतम बचुटे । केज 

केज तालुक्यातील बोरगाव येथे सख्या भावाने मित्राच्या मदतीने बहिणीचा खून केल्याची खळबळजनक घटना घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार केज तालुक्यातील बोरगाव येथे दि. २१ एप्रिल २०२१ बुधवार रोजी शितल लक्ष्मण चौधरी (वय २८ वर्ष) हिचा तिचा सख्खा भाऊ दिनकर उर्फ दिनू गोरख गव्हाणे आणि त्याचा मित्र दिगंबर धनंजय वळेकर यांनी संगनमत करून तीचा पलंगावर झोपलेली असलेल्या अवस्थेत गावा जवळील पांढरीचे शेतातील तिच्या चुलते माजी सरपंच जालिंदर गव्हाणे यांच्या शेतातील घरात तीक्ष्ण हत्याराने डोक्यात वार करून खून केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी मयत महिलेचा चुलतभाऊ नानासाहेब गव्हाणे यांच्या फिर्यादी वरून केज पोलीस स्टेशनला दिनकर उर्फ दिनू गोरख गव्हाणे आणि दिगंबर धनंजय वळेकर याच्या विरुद्ध गु र न १९७/२०२१ भा दं वि ३०२ आणि ३४ नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

या प्रकरणी मयत शीतल चौधरी हिचा चुलत भाऊ नानासाहेब जालींदर गव्हाणे याने केज पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, त्यांची चुलत बहीण शितल लक्ष्मण चौधरी ही पुणे येथे राहत असुन आठ दिवसा पुर्वी ती तीच्या मुलीस घेवुन आईला भेटण्यासाठी बोरगाव येथे आली होती. ती आमच्या शेजारी राहत होती. दिनांक २० एप्रिल मंगळवार रोजी रात्री सर्वानी ९:०० वा. च्या सुमारास जेवण करून दहा वाजता झोपी गेले. दि. २१ एप्रिल रोजी रात्री ३:३० जण्या ४:०० वा.च्या सुमारास त्यांची चुलती संगिता गोरख गव्हाणे ही घराकडे आली. ते घराच्या गच्चीवर झोपले होते. तीने नानासाहेब यास उठवून रडत सांगितले की, तिचा मुलगा दिनकर उर्फ दिनु गोरख गव्हाणे व त्याच्या सोबत आपल्या गावातील दिगंबर धनंजय वळेकर हे दोघेजण रात्री १:३० ते २:३० वा. सुमारास घरामध्ये येवुन मुलगी शितल लक्ष्मण चौधरी (वय २८ वर्षे) हिला कोणत्यातरी अज्ञात कारणावरून व कुठल्यातरी हत्याराने जीवे मारण्याच्या उद्देशाने उजव्या कपाळावर मारून गंभीर जखमी करून ठार मारले आहे. 

या प्रकरणी घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी भास्कर सावंत, पोलीस निरीक्षक प्रदीप त्रिभुवन, पोलीस उपनिरीक्षक श्रीराम काळे, गुन्हे तपास शाखेचे दिलीप गित्ते, उपविभागीय कार्यालयातील आय बाईकचे पथक यांनी घटनास्थळी जाऊन घटना व घटना स्थळाची पहाणी केली. प्रेत उत्तरीय तपासणी व शवविच्छेदन करण्यासाठी उपजिल्हा रुग्णालय केज येथे पाठविले आहे. या प्रकरणी पुढील अधिक तपास पोलीस निरीक्षक प्रदीप त्रिभुवन हे करीत असून गुन्हेगारांना ताब्यात घेण्यासाठी पोलीस त्यांच्या मागावर असल्याची माहिती मिळाली आहे.

कु. परी झाली पोरकी !

मयत शीतल चौधरी हिचे सासर हे उस्मानाबाद जिल्ह्यातील येरमाळ्या जवळ पिंपळवाडी आहे. शीतलचा पती लक्ष्मण चौधरी हा काही वर्षांपूर्वी रेल्वे अपघातात मृत्यू झाला होता. त्यामुळे आता त्यांची मुलगी कु. परी (वय ११ वर्ष) ही आता आई-बापाविना पोरकी झाली आहे.

खुनाचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही

मयत शितलचा सख्खा भाऊ दिनकर गव्हाणे व त्याचा मित्र दिगंबर वळेकर याने तिचा खून का केला? हे अद्याप स्पष्ट झाले नसले तरी त्याने बहिणीकडून पैसे उसने घेतले असल्याची व ती बाहेरख्याली असल्याची चर्चा गावात दबक्या आवाजात सुरू आहे.

No comments