Breaking News

दुचाकीचा अपघातात ऊसतोड मुकादम ठार


खरात आडगाव फाट्याजवळील दुर्देवी घटना

माजलगाव : ऊस तोडणीचा पट्टा पडल्याने घर जवळ करण्यासाठी निघालेल्या ऊसतोड मुकादमाचा दुचाकी स्लिप होऊन झालेल्या अपघातात जागीच मृत्यू झाला.ही घटना राष्ट्रीय महामार्गावर खरात आडगाव फाट्याजवळ शुक्रवार दि.16 रोजी दुपारी साडेबारा वाजता घडली.

परमेश्वर शिवाजी घाटे(वय 27 वर्ष) राहणार कापडसिंगी ता.सेनगाव जि. हिंगोली हा ऊस तोडणी मुकादम वडवणी तालुक्यातील ख.लिमगाव या शिवारात आपल्या टोळीसह ऊस तोडणीचे काम करत होता.ऊस कारखाना बंद झाल्याने सदरील टोळी राष्ट्रीय महामार्ग कल्याण विशाखापट्टणम वरून ट्रकमधून आपल्या गावी कापडसिंगीकडे निघाली होती.

तर परमेश्वर घाटे दुचाकीवरून ट्रकच्या मागे पुढे प्रवास करत गावाकडे निघाला होता.दरम्यान माजलगाव तालुक्यातील खरात आडगाव फाट्याजवळ परमेश्वर घाटे यांची दुचाकी अचानक स्लिप झाली,व फरफरत जाऊन रस्त्याच्या बाजुला असणाऱ्या किलोमीटर दर्शवणाऱ्या दगडाला घाटे याचे डोके जोरात आद्ळले.त्यामुळे घाटे याचा  रक्तस्त्राव होऊन जागीच मृत्यू झाला. दरम्यान मृत शरीराला शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. ग्रामीण पोलिसात आकस्मात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

No comments