Breaking News

मोमीनपुऱ्यात आम आदमी पक्षाने नगरपरिषदेच्या अस्वच्छतेचा कारभार उघडा पाडला

 


औ डी एफ नामांकन बीड नगरपालिकेला मिळतें कसे यावर शंका  

बीड :  क्षीरसागरांची कित्येक दशके सत्ता असलेल्या बीड शहरात गेल्या अनेक दिवसांपासून अस्वच्छता, घाणीचे साम्राज्य झाले आहे. बीड नगरपालिके कडून स्वच्छता वेळेवर होत नसल्याने आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांनी हातात झाडू घेत शहरात स्वच्छता मोहीम राबविली आहे. आप कार्यकर्त्यांनी प्रत्येक रविवारी स्वच्छता अभियान राबविण्याचा संकल्प सुरूच ठेवला असून 15 व्या रविवार रोजी मोमीनपुरा, बीड मामला आदी भागात स्वच्छता अभियान राबविण्यात आले.

बीड नगर पालिका स्वच्छतेबाबत फक्त ढोंग करत आहे, ते ढोंग जनते समोर आणण्याचा प्रयत्न आम्ही करणार असल्याचे जिल्हाध्यक्ष अशोक येडे यांनी म्हंटले आहे. जनतेशी स्वच्छता अभियानावेळी संवाद साधताना संघटन मंत्री प्रा. राऊत व जिल्हा उपाध्यक्ष सय्यद साजेद यांनी सत्ताधारी क्षीरसागर व विरोधक क्षीरसागरांचा नाकर्तेपणा जनतेसमोर आणण्यात येणार असल्याचे सांगितले. यावेळी अशोक येडे जिल्हा अध्यक्ष, रामधन जमाले जिल्हा सचिव, प्रा ज्ञानेश्वर राउत संघटन मंत्री, राम भाऊ शेरकर,प्रा संदिप गांदगे योगेश पवळ, अभिषेक टाळके, आदींसह आम आदमी पक्षाचे कार्यकर्ते मोठया संख्येने सहभागी झाले होते.
व्हीडीओ 
पाहण्यासाठी क्लिक करा

No comments