Breaking News

साळेगावमध्ये ज्वारीच्या कणसाचा ढीग तर पानटपरी आगीत भस्मासात


गौतम बचुटे । केज  

केज तालुक्यातील साळेगाव येथे जळीतच्या दोन घटना घडल्या आहेत.

या बाबतची माहिती अशी की, दि. ४ एप्रिल रविवार रोजी सतीश गित्ते यांच्या शेतात ज्वारीचे खळे करण्यासाठी काढणी ठेवलेल्या ज्वारीच्या कणसाच्या ढिगाला आग लागून ज्वारी जळून खाक झाली. यात सुमारे ५० हजार रु. चे नुकसान झाले. सदर आग ही विज वाहक तारेच्या शॉर्ट सर्किट किंवा स्पार्किंगमुळे झाली असावी. अशी शंका शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. 

तर दुसऱ्या घटनेत सळेगावच्या बस स्टँडवरील तुकाराम गित्ते यांची पानटपरी जळून खाक झाली. यात टपरी व आतील साहित्य जळून सुमारे २५ हजार रु. चे नुकसान झाले आहे. या घटनेतील सदर आग कशा मुळे लागली असावी हे स्पष्ट झालेले नाही. मात्र एकाच दिवशी साळेगाव येथे जळीतच्या दोन घटना घडल्या आहेत.


No comments