Breaking News

कोव्हिड रुग्णालयात डॉक्टरांचा आत्मविश्वास वाढविणारे आदर्श लोकप्रतिनिधी ठरताहेत आमदार संजय दौंड!


आमदार हा 'मालक' नसून 'सेवक' असल्याचा गोरगरीब कोरोनाग्रस्त रुग्णांना दुर्मिळ अनुभव...

शिवाजी भोसले । अंबाजोगाई

सर्वसाधारणपणे राजकारणातील राजकीय व्यक्ती  यांच्या संदर्भात सर्वसामान्यांच्या विचार आणि भावना या जास्तीत जास्त नकारात्मक अशाच ऐकायला मिळतात. परंतु सद्य करोना च्या विषाणू फैलावाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या प्रचंड विदारक संकटात आपला जीव वाचवण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या श्रीमंत आणि उच्च राजकारण्यांच्या पंगतीत अपवाद ठरत असलेले विधानपरिषद सदस्य आमदार संजयभाऊ दौंड यांच्या आंबेजोगाई येथील रुग्णालयात डॉक्टरशी सातत्याने संपर्कात राहून गोरगरिबांचा जीव वाचविण्याच्या प्रयत्नाचा एक भाग म्हणून... लोकप्रतिनिधी कसा असावा? याचे उत्तर ग्रामीण भागातील कोरोनाग्रस्त रुग्णांना मिळत आहे.

बीड जिल्ह्यातील उपजिल्हा असलेल्या आंबेजोगाई येथे दोन कोव्हिड सेंटर विविध शासकीय सुविधा आणि कर्मचाऱ्यांसह उपलब्ध आहेत. सद्यस्थितीमध्ये अत्यंत भयावह अशी परिस्थिती असताना आणि महाराष्ट्रात अत्यंत भीषण आणि धोकादायक पातळी गाठत असताना बीड जिल्ह्याने सातशे पर्यंत मारलेली रुग्णांची मजल ही चिंता करायला लावणारी आहे. अशा स्थितीत गोरगरीबां कडे पैसा नाही. शासकीय रुग्णालयांमध्ये डॉक्टर जीवाची बाजी लावून सर्वसामान्य रुग्णांचा जीव वाचवण्यासाठी प्रयत्न करत आहे. परंतु तरीही विविध अडचणींना त्यांना सामोरे जावे लागते. अशा स्थितीत आंबेजोगाई येथे आमदार संजय दौंड यांनी आपल्या आमदारकीची झूल बाजूला ठेवून एका सामान्य माणसाचं हृदय घेऊन वागण्याची निर्माण केलेली प्रथा आज गोरगरीब रुग्णांना आधार देणारी ठरत आहे.

आमदार संजय दौंड सकाळी उठल्यापासून स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रुग्णालयातील कॉलेज सेंटर येथे स्वतः जातीने उपलब्ध होऊन संबंधित डॉक्टरांशी संवाद साधतात. येथील रुग्णांशी संवाद साधतात. एवढेच नव्हे; अडचणी जेव्हा जेव्हा येतात तेव्हा डॉक्टरांच्या विचारविनिम यातून महाराष्ट्र राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय धनंजय मुंडे साहेब,व इतर लोकप्रतिनिधी यांच्याशी सातत्याने संपर्कात राहून कोविंड रुग्णांच्या जीविताला धोका होऊ नये आणि जास्तीत जास्त लोकांना योग्य उपचार मिळून आपलं जीवन पुन्हा जगण्याची संधी मिळावी यासाठी प्रसंगी स्वतः जीव धोक्यात घालून प्रयत्नांची शिकस्त करत आहेत. आंबेजोगाई ची आरोग्य विभागातील विविध यंत्रणा, सर्वसामान्य कर्मचारी, आरोग्य क्षेत्रातील वरिष्ठ डॉक्टर आणि रुग्ण तसेच पत्रकार आणि समाजधुरीण यांच्याशी सातत्याने चर्चा करून मोठेपणाचा बडेजाव दूर ठेवून माणुसकी चा मंत्र जपून अहोरात्र त्यांची चाललेली या संकट प्रसंगी काळातील आरोग्य क्षेत्रातील कर्तव्य सेवा माणुसकीचा वेगळा संदर्भ  देणारी ठरत आहे.

नुकतीच मंगळवारी आंबेजोगाई येथील दोन कोव्हिड सेंटर मधील एक महिला आणि सात पुरुष अशा आठ जणांना एकत्र द्यावा लागणारा अग्नीडाग हा  बुद्धी संपन्न अशा मनोहर आंबा नगरीतील ही घटना निश्चितच मनाला वेदना देणारी, व नि:शब्द करणारु आहे... याविषयी आमदार संजय दौंड यांनी तीव्र दुःख व्यक्त करून संबंधितांच्या कुटुंबीयांना जगण्याचे बळ देवो अशी प्रार्थना  केली आहे.

' सर्वसामान्य गोरगरीब,दिनदलित, दुबळ्या, अनाथ अपंग शेतमजूर शेतकरी शेतमजूर वंचित घटकांच्या संकट प्रसंगी दुःखात सहभागी होऊन दुःख हलकं करणारा लोकप्रतिनिधी मी पहिल्यांदा पाहिला.. आमदार संजय भाऊ दौंड यांच्या माध्यमातून कोव्हिड सेंटरमधील डॉक्टर कर्मचारी रुग्ण आणि समाजधुरीण यांना सोबत घेऊन आधार देणारे भाऊ मी आज पालक म्हणून पाहिले.. त्याचा मला रुग्णप्रतिनिधी म्हणून आनंद वाटला..!'

( एक नागरिक, अंबाजोगाई ) No comments