Breaking News

बीडमध्ये खदाणीत बुडून तिघांचा मृत्यू


आई- वडिलांनी घटनास्थळी फोडला हंबरडा

बीड ग्रामीण पोलीस घटनास्थळी दाखल

बीड : पोहण्यासाठी गेलेल्या तिघांचा खदानीतील पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना नाळवंडीरोड लगत असलेल्या खदाणीत शुक्रवारी (दि.१६) सायंकाळी उघडकीस आली. घटनेची माहिती होताच बीड ग्रामीण पोलिस ठाण्यातील कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून मुलांच्या आई- वडिलांनी एकच हंबरडा फोडला. दरम्यान दोघांचे मृतदेह सापडले असून अन्य एकाचा शोध घेण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार शहरातील गांधीनगर मधील तीन मुले शुक्रवारी सकाळी पोहण्यासाठी नाळवंडी रस्त्यालगत असलेल्या खदाणीत गेले होते. मुले सकाळपासून घरी नसल्याने त्यांचा शोध घेण्यात येत असताना मुले खदाणीत पोहण्यासाठी गेल्याचे समजताच त्याठिकाणी नागरिकांनी धाव घेतली. दरम्यान घटनेची माहिती होताच घटनास्थळी बीड ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोनि संतोष साबळे, सपोनि योगेश उबाळे, फोजदर पवनकुमार राजपूत, रोटे, पोहेकॉ आनंद मस्के, राऊत, सानप, दूबाले, जायभाय, तांदळे यांनी धाव घेतली. मात्र त्या तीन मुलांचा पाण्यात बुडून दुर्देवी मृत्यू झाला. यातील ओम गणेश जाधव व शाम सुंदर देशमुख अशी मृत्यू झालेल्या मुलांची नावे असून या दोघांचे मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आले असून अन्य एकाचा शोध घेण्यात येत आहे. या घटनेनंतर तिन्ही मुलांच्या आई- वडिलांनी घटनास्थळी एकच हंबरडा फोडला. या ह्रदयद्रावक घटनेने गांधीनगर परिसरावर शोककळा पसरली आहे. No comments