Breaking News

केजमध्ये डीवायएसपी उतरले रस्त्यावर तरीही बेशिस्तीला आळा बसेना !


गौतम बचुटे । केज

काल रात्री पासून सर्वत्र कडक लॉकडाऊनला सुरुवात झाली आहे. अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी वगळता प्रवासाची कुणालाही मुभा नाही. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतील संकटात मात्र केजमध्ये नागरिक शासनाच्या नियमांचे पालन करताना दिसत नाहीयेत. बिनदिक्कतपणे रस्त्यावर फिरताना दिसतायत. नागरिकांनी नियमांचे काटेकोरपणे पालन करण्यासाठी केजचे उपविभागीय पोलिस अधिकारी भास्कर सावंत हे स्वतः रस्त्यावर उतरल्याचे गुरुवारी (दि.२३) दिसून आले. मात्र तरीही बेशिस्तीला आळा बसत नसल्याचे दिसून आलं.

अद्यापही केज आणि परिसरातील नागरिकांना शिस्त आणि नियमांचे काही देणे घेणे नसल्याचं दिसतंय. . अनेक नागरिक रस्त्यावर फिरतायत. यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढत असून अनेकांनी आपले जीवदेखील गमावले असल्याच्या घटना घडलेल्या आहेत. मात्र तरी सुद्धा बेफिकिरपणे नागरिक रस्त्यावर येत आहेत. यामुळे आज डीवायएसपी भास्कर सावंत रस्त्यावर उतरले असून ये- जा करणाऱ्याची चौकशी करीत विनाकारण घराबाहेर पडू नका असं आवाहन त्यांनी केजकरांना केले आहे.


No comments