Breaking News

मगरवाडी - दस्तगिरवाडी ग्रामपंचायतने कोविड केअर सेंटर चालू करावे – माझी उपसरपंच धनराज माने

शिवाजी भोसले ।  अंबाजोगाई

कोरोना या महामारीने देशात हाहाकार माजवला आहे त्या अनुषंगाने बीड जिल्ह्यात कोरोनामुळे भयंकर परिस्थिती निर्माण होऊन अनेकांचे बळी जात आहे. त्याप्रमाणे मगरवाडी मध्ये सुद्धा कोरोनामुळे जीव जात आहे व कोरोना रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहे तरी यांचा प्रभाव वाढू नये याकरिता मगरवाडी ग्रामपंचायत पुढाकार घेऊन गावांत कोविड केअर सेंटर चालू करावे अशी मागणी माझी उपसरपंच धनराज माने  यांनी  केली आहे.

 परंतु आपल्या गावातील नागरिकांचे सर्वांच्या हातावर पोट असल्यामुळे लोकांची मोठ्या दवाखान्यात जाण्याची परिस्थिती नाही आहे आणि अनेकांना कोरोनाची ची लागण झाली आहे त्यासाठी कोरोनाची टेस्ट करण्याकरिता ग्रामीण रुग्णालय किंवा खाजगी रुग्णालय या ठिकाणी जावे लागते त्यामुळे लोकांचे जाण्या-येण्यासाठी सुद्धा हाल होतात त्यांची व्यवस्था झाली पाहिजे जर कोणाला कोरोनाची लागण झाली असेल व त्यांना कमी प्रमाणात स्कोर असतील तर त्यांना आपल्याला कोविड केअर सेंटर मध्ये ठेवता येईल आणि ते लोकांमध्ये मिसळणार नाही आणि त्याचा जास्त प्रादुर्भाव वाढणार नाही यासाठी कोविड केअर सेंटर चालू केले पाहिजे. 

आपल्या गावाशेजारी असलेले अंबाजोगाई  शहरात प्रत्येक तालुक्यातून रुग्ण येतात  त्या मुळे मृत्यू ची संख्य फार वाढत आहे त्यामुळे काही लोकं घाबरत आहेत त्यामुळे गावामध्ये कोविड केअर सेंटर चालू करावे य असे आम्हाला वाटते या परिस्थितीत कोणताही हेवा देवा न करता राजकारण न करता आम्ही सुद्धा या कोविड केअर सेंटरला सहकार्य करू तरी आमच्या यामागणी ला आपण गांभीर्याने घ्यावे व गाव आम्ही चालवतो असे म्हणणारनी घरात न बसता आता पुढे येण्याची गरज आहे नाहीतर पुढील काळात जनता त्यांना घरी बसल्या शिवाय राहणार नाही त्यामुळे लवकरच ग्रामपंचायतीने कोविड केअर सेंटर चालू करावे आणि लोकांची काळजी घ्यावी आणि सर्व गावामध्ये हायड्रोजन पेरॉक्साईड औषध फवारणी करावी रोड ला कचरा पडलेला आहे त्याची साफसफाई करावी गटारी साफ करावी आणि मगरवाडी मधील नागरिकांनी काळजी घ्या तोंडाला मास लावा सोशल डिस्टन्स ठेवा वेळोवेळी हात धुवा असे नागरिकांना माझी उपसरपंच धनराज  माने  यांनी आवाहन केले आहे. 


No comments