Breaking News

कोरोना काळात जिल्हा रुग्णालयात रक्ताचा तुटवडा अतिरिक्त जिल्हाधिकारी यांचे आवाहन


२० सामाजिक संघटनांचा प्रतिसाद; बीड, गेवराई, माजलगाव शहरामध्ये होणार शिबीरे

 

बीडमहाराष्ट्र राज्यात व आपल्या जिल्ह्यात रक्ताचा तुटवडा जाणवत आहे त्यानुषंगाने जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी सामाजिक संघटनांची बैठक घेऊन नियोजन करण्याचे निर्देश अतिरीक्त जिल्हाधिकारी तुषार ठोबरे यांना दिले. त्यानुसार बुधवारी (दि. सात) जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहामध्ये रोटरी क्लबच्या सर्व संघटना, महाविद्यालयांचे प्रतिनिधी इतर सामाजिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीस  अतिरीक्त जिल्हाधिकारी  ठोंबरे, जिल्हा रुग्णालयातील रक्तपेढी प्रमुख डॉ.जयश्री बांगर, अपत्ती विभाग प्रमुख उमेश शिर्के उपस्थित होते.

त्यानुसार अपर जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे यांनी सामाजिक संघटना व पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन आवाहन केले. उपस्थित पदाधिकाऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. शुक्रवार पासून बीड शहात दोन ठिकाणी, गेवराई, माजलगाव या तीन शहरांमध्ये रक्तदान शिबीर घेण्याचे ठरवण्यात आले आहे. बीड शहरातील माँ वैष्णव पॅलेस येथे 9 ते 16  एप्रिल 2021 पर्यंत रक्तदान सप्ताह शिबीराचे नियोजन करण्यात आले आहे.

मा.जिल्हाधिकारी व  जिल्हा शल्य चिकित्सक  डॉ. सुर्यकांत गित्ते यांच्या सुचनेनुसार कोव्हीड -१९ महामारीच्या अनुषंगाने सर्व नियम पाळून राज्य रक्त संक्रमण परिषदेने दिलेल्या मार्गदर्शक सूचनेनुसार रक्तदान शिबीरे घेण्याचे नियोजन केले जात आहे. सदरील बैठकीमध्ये डॉ. जयश्री बांगर (विभागीय रक्त संक्रमण अधिकारी व रक्त पेढी प्रमुख जी.रु. बीड) यांनी सर्व रक्तदान शिबीर आयोजकांना शासनाच्या रक्तदान शिबीर मार्गदर्शक सूचनांचे सविस्तर मार्गदर्शन केले.

अपर जिल्हाधिकारी श्री ठोंबरे यांनी उपस्थितांना पुढीलप्रमाणे, आवाहन केले होणाऱ्या रक्तदान शिबिरात उस्फुर्तपने सर्व नियम व अटी पाळून सहभाग नोंदवावा.पुढील प्रमाणे संघटना रक्तदान शिबिरामध्ये सहभागी होणार मोरया प्रतिष्ठान बीड : अमर नाईकवाडे, भारतीय जैन संघटना : नितीन कोटेचा, आशीश जैन, राजस्थान सेवा समाज बीड : रामेश्वर कासट, ओमप्रकाश जाजू,  होलसेल रिटेल किराणा असोसिएशन : जवाहरलाल कांकरिया, बीड जिल्हा माहेश्वरी सभा : गोपाल कासट,  बीड तहसील माहेश्वरी सभा : गिरीश सोहनी, हेमंत बियाणी, बीड तालुका व्यापारी महासंघ : अशोक शेटे, वैष्णव देवी मंदिर संस्थान : संजय सोहनी, शिवप्रसाद दायमा, रामदेव बाबा मंदीर संस्थान : डी.एम. सारडा, जगदीश सिकची, विप्र समाज संघटना : अशोक तिवारी, फामजी पारीख, भरत पटेल, पवन शर्मा, शाम पारीख,  एम.आर.संघटना, बलभीम महाविद्यालयात रासेयो, केएसके महाविद्यालय रासेयो, बंकटस्वामी महाविद्याल रासेयो, इतर नागरिक व संघटनांचे संघटनांचा समावेश असेल. 

नागरिकांना  रक्तदान करण्यासाठी संपर्क खालीलप्रमाणे

दि. ९ एप्रिल २०२१ : ठिकाण : बलभीम नगर पेठ बीड : धनराज धन्वे : ८१८०८४८४०३,

 दि. १० एप्रिल २०२१ : ठिकाण : बालेपीर,बीड : प्रशांत घुगरे ९८३४२८७४६२, गेवराई : प्रसाद जाेशी : ९४२३७५७४८५, काळा हनुमान ठाणा, बीड  : शहनवाज खान : ९०९७९७७६०,

दि. ११ एप्रिल २०२१ : ठिकाण :बेदरे लाॅन्स गेवराई : सुरेश बरगे : ९३२६२६२५८५,सम्राट चाैक, बीड : हर्षवर्धन जाधव : ९०४९८३८३८२,

 दि. १२ एप्रिल २०२१ : तकीया मसजीद : सय्यद खिजर ९४०५०६६२७०, नागोबा गल्ली बीड : आदित्य जोगदंड  : ९९२३८१६००६,

दि. १८ एप्रिल २०२१ ठिकाण: वैष्णवी मंगल कार्यालय, माजलगाव : अशोक मगर : ७७७४०२०४०७

बीड शहरातील सर्व रोटरी क्लब व सर्व व्यापारी संघटना  यांचे संयुक्त विद्यमाने  माँ वैष्णव पॅलेस,बीड येथे रक्तदान सप्ताह दिनांक ०९/०४/२०२१ ते १६/०४/२०२१ रक्तदान  करण्यासाठी संपर्क खालीलप्रमाणे

बीड जिल्हा व्यापारी महासंघ : संतोष सोहणी : कार्याध्यक्ष बीड जिल्हा : ७८७५७१७७७७,

बीड शहर व्यापारी महासंघ : विनोद पिंगळे : शहाराध्यक्ष :९४२००१८१५१,

रोटरी क्लब बीड : सुनील खंडागळे : ८६६८५१६६१५,

रोटरी क्लब ऑफ मीट टाऊन : राहुल तांदळे :  ९८२२७७७४८५

 रोटरी क्लब ऑफ सिटी : सुजीत सुर्यवंशी : ८८९२१७१८१९,

 रोटरी क्लब ऑफ बीड सेंट्रल : सुशील अब्बड : ९४०५०५१८५१ यांच्याकडे  रक्तदात्यांनी संपर्क साधावा. 

 रक्तदात्यांना आयोजकांनी दिलेल्या वेळेलाच रक्तदानास यावे जेणेकरून कोविड-१९ नियमांचे सर्व पालन होईल.

 शासनाच्या रक्तदान शिबीर मार्गदर्शक सूचना

रक्तदान शिबीरे रक्तपेढीच्या गरजेनुसार घेण्यात यावी . शक्यतो रक्तदान शिबीरे पाच ( ५ ) रक्तदात्यांच्या समुहा मध्ये ( Batch ) रक्तपेढीमध्ये आयोजीत करण्यात यावीत . स्वैच्छिक रक्तदान शिबीरे घेतल्यास देखील हाच नियम लागू राहिल .

 > रक्तदानाच्या दिवशी नियमित रक्तदात्यांना दुरध्वनीव्दारे रक्तपेढीमध्ये रक्तदान करण्याची वेळ कळवावी , जेणेकरुन एका वेळेस पाच ( ५ ) रक्तदात्यांपेक्षा जास्त समुह जमा होणार नाही .

> स्वैच्छिक रक्तदान शिबीरांमध्ये दोन बेड मध्ये कमीत कमी एक मिटर अंतर ठेवण्यात यावे .

> रक्तपेढीमध्ये व स्वैच्छिक रक्तदान शिबीराच्या प्रवेशव्दारावर रक्तदात्यासाठी हॅन्ड सॅनिटायझर ठेवण्यात यावे . हात स्वच्छ धुतल्यानंतरच रक्तदानासाठी रक्तदात्यास प्रवेश देण्यात यावा .

> रक्तपेढी कर्मचारी hand gloves , mask इत्यादी सुरक्षित साधनांचा वापर करतील याची दक्षता घ्यावी . याबाबत रक्तपेढयांना सुचना दिलेल्या आहेत.

> स्वैच्छिक रक्तदान शिबीरात रक्तदान शिबीरातील बेड ची संख्या ५ ते १० असावी व एका तासामध्ये प्रति बेड ५ ते १० रक्तदात्यांच्या वर संख्या जाऊ नये याची काळजी घेण्यात यावी .

> रक्तदाता मागील २८ दिवसांमध्ये कोणत्याही देशातून आलेला नसावा किंवा त्यांच्या कुटुंबियातील , सहकाऱ्यामधील परदेशातून आलेल्या कोणत्याही व्यक्तीच्या संपर्कात आलेला नसावा .

> रक्तदात्यास मागील २८ दिवसांमध्ये खोकला , सर्दी व ताप याची लक्षणे नसावीत .

> रक्तदात्याने रक्तपेढीमध्ये किंवा स्वैच्छिक रक्तदान शिबीराच्या ठिकाणी गर्दी करु नये .

 > रक्तपेछीमध्ये अथवा स्वैच्छिक रक्तदान शिबीराच्या ठिकाणी पुरेसे अंतर कमीत कमी १ मिटर ( Social distancing ) ठेवावे .

रक्तदान कोण करु शकतो ?

> रक्तदाता मागील २८ दिवसांमध्ये कोणत्याही देशातून आलेला नसावा किंवा त्यांच्या कुटुंबियातील , सहकाऱ्यामधील परदेशातून आलेल्या कोणत्याही व्यक्तीच्या संपर्कात आलेला नसावा .

> रक्तदात्यास मागील २८ दिवसांमध्ये खोकला , सर्दी व ताप याची लक्षणे नसावीत .

> रक्तदात्याने रक्तपेढीमध्ये किंवा स्वैच्छिक रक्तदान शिबीराच्या ठिकाणी गर्दी करु नये .

> एका वेळेस रक्तपेढीमध्ये अथवा स्वैच्छिक रक्तदान शिबीराच्या ठिकाणी पाच ( ५ ) पेक्षा जास्त रक्तदात्यांनी जाऊ नये .

> रक्तपेढीमध्ये अथवा स्वैच्छिक रक्तदान शिबीराच्या ठिकाणी पुरेसे अंतर कमीत कमी १ मिटर पर्यंत ( Social distancing ) ठेवावे . रक्तदाता सदृढ व निरोगी स्त्री / पुरुष असावा .

> रक्तदात्याचे वय १८ पेक्षा जास्त व ६० पेक्षा कमी असावे .

> रक्तदात्याचे वजन ४५ कि.ग्रॅ . पेक्षा जास्त असावे ( स्त्रीयांचे वजन शक्यतो ५० पेक्षा जास्त असावे )

> स्त्रीयांकरीता सुचना : गरोदर असल्यास व मुल अंगावर स्तनपान करीत असल्यास तसेच मासिक पाळी सुरु असल्यास रक्तदान करु नये .

> मागील रक्तदानास पुरुषांकरीता ३ महिने व स्त्रीयांकरीता ४ महिने पूर्ण झालेले असावे . रक्तदान उपाशी पोटी करु नये . रक्तदानापूर्वी हलका नाश्ता करावा व भरपूर पाणी पिणे आवश्यक .

> रक्तदानापूर्वी व रक्तदानानंतर कमीत कमी ६ तास तंबाखु , गुटखा , बीडी, सिगरेट , दारु यांचे सेवन करु नये . आरामदायक कपडे परिधान करा . तसेच पुरेशी झोप घ्या .

 > रक्तदान करण्यापूर्वी तुम्हाला विचारलेल्या प्रश्नांची प्रामाणिकपणे उत्तरे दयावीत . रक्तदानापूर्वी वजन , हिमोग्लोबित , नाडी , रक्तदाब व इतर महत्वाच्या वैद्यकिय तपासण्या डॉक्टरांकडून करण्यात येतील .

No comments