Breaking News

पाण्याच्या भटकंतीत हरणाचा मृत्यू


 बाबासाहेब देशमाने । दिंद्रुड 

माजलगाव तालुक्यातील दिंद्रुड नजदीक बोबढवा जवळ पाण्याच्या भटकंतीत असताना  एका हरणाचा दुर्दैवी मृत्यू होण्याची घटना गुरुवारी सायंकाळी चार वाजे दरम्यान घडली.

   

उन्हाचा पारा वाढला असून वन्यप्राणी पाण्याच्या भटकंतीत वन वन फिरत आहेत. असेच एक हरिण दिंद्रुड नजदीक बोबढवा जवळ हायवेलगत मृतावस्थेत आढळून आले. स्थानिकांनी धारूर वनविभागाला माहिती दिली असता वन विभागाच्या कर्मचारी पोपळे एम एस वनमजुर, पारवे एस डी वनमजुर दाखल होत हरणाचे शव धारूर येथील पशुवैद्यकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी गुरुवारी सायंकाळी दाखल केले होते. पाण्याच्या भटकंतीत हरिणाचा अज्ञात वाहनाच्या धडकेने दुर्दैवी मृत्यू झाला असावा असा अंदाज स्थानिकांनी व्यक्त केला.

 

No comments