Breaking News

बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आचरणात आणावे-पो. नि. सुरेश चाटे


 

परळी वैजनाथ : भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आजच्या काळातही आचरणात आणण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन संभाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेश चाटे यांनी केले.डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३० व्या जयंती निमित्त गौतमनगर, फुलेनगर येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

                 विश्वरत्न, बोधीसत्व, भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त शहरातील गौतमनगर, फुलेनगर येथे जयंती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला पोलीस निरीक्षक सुरेश चाटे यांच्या हस्ते पंचशिल ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले.व पंचशिल वंदना घेण्यात आली. यावेळी विचारमंचावर नगरसेवक केशव गायकवाड, फुले आंबेडकरी अभ्यासक इंजि. भगवान साकसमुद्रे, पोलीस श्री.भताने, सचिन सानप,श्री.दडगे, अशोक गवळी किरण वाघमारे, फिरोज खान , दत्ता जाधव, काळे भद्रे, पप्पू लांडगे, बालाजी रायबोळे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी पुढे बोलताना श्री.चाटे म्हणाले की, या पंचशिल तत्वात हिंसा, चोरी, व्याभिचार, खोटे न बोलणे, मद्यपान न करणे हे केल्याने माणसा माणसातील संबंध चांगले नित्तीमान राहतील. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.सरवदे यांनी तर आभार वैजनाथ वाघमारे यांनी केले.


No comments