Breaking News

कोरोनाची महामारीचा जोर वाढतोय जीवाची काळजी घ्या : सुरेखा जाधव


बीड :  कोरोना या भयानक आजाराने संपूर्ण भारतच नव्हे तर जगामध्ये गेल्या एक वर्षांपासून अक्षरशः थैमान घातले आहे .एक लहानात लहान विषाणू ने मानव प्रजाती ला मरण्याच्या तोंडावर आणून सोडले आहे इतकेच नव्हे तर कित्येक घरातील लहान मोठे व्यक्तीचा मृत्यू होऊन घर उध्वस्त झाल्याचे ही आपण पाहत आहोत.कोरोनाच्या महामारीचा कित्येक लोकावर उपासमारीची ही वेळ आली आहे अशा महामारीमध्ये जनता ही परेशान झालेली आहे सध्याचा काळ हा खूप बिकट काळ आहे जनतेने आता स्वतःची काळजी स्वतःच करायला हवी .कारण या परिस्थितीत मध्ये आपणच आपला परिवार मरणाच्या खाईत तर ढकलत नाहीत ना याचा विचार प्रत्येक नागरिकांनी आपल्या अंतःकरणात पाहून किंवा विचार करूनच घराबाहेर पडा आपण विनाकारण फिरून आपल्या परिवारात वाईट वेळ आणू नका कारण आपल्याच हाताने आपला परिवार संपवत आहोत हे लक्षात ठेवा कोरोनाच्या या आलेल्या दुसऱ्या लाटेमध्ये प्रशासन ही हतबल झाल्याचे दिसून येत आहे.

  संपूर्ण भारत देशांत रेमडेसिव्हर इंजेक्शनचा तुटवडा जाणवू लागलेला आहे . कोरोनाच्या रुग्णांना ऑक्सिजन वेळेवर मिळत नसल्याने कित्येक लोकांचे प्राण जात असतानाचे आपण पाहत आहोत .तर रुग्णांना बेड उपलब्ध होणे ही कठीण झाले आहे.एक दिवसात 15 ते 20 पर्यंत मृत्यूची नोंद ही होताना आपण पाहत आहोत . त्यामुळे बीड जिल्ह्यातील जनतेने विनाकारण घराबाहेर पडू नये आपला जीव धोक्यात घालू नये .

मोलमजुरी करून उदरनिर्वाह करणाऱ्या जनतेने ही आपल्या जीवाची काळजी घेऊन प्रशासनाला सहकार्य करावे . ग्रामीण भागात ही कोरोनाचा संसर्ग वाढत आहे .यासाठी ग्रामीण मध्ये राहणाऱ्या जनतेने ही या कोरोनाच्या रोगाला हरवण्यासाठी  सर्वोतोपरी प्रयत्न करावे पोलीस प्रशासन आपल्या जीवाची पर्वा न करता आपल्या सेवेसाठी दिवस रात्र एक करताना ही आपण पाहत आहोत.पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे व या भयंकर आजाराला आपण सर्वांनी मिळवून संपूर्णपने हरवू या सर्व समाजातील जनतेने शासनाने कोरोनाच्या ठरवून दिलेल्या नियमांचे पालन करावे, तसेच तोंडाला मास्क लावावे,सॅनिटायझर चा वपर करा ,साबणाने हाथ स्वछ धूत राहा.सामाजिक अंतर पाळा . व यातूनच आपला जीव वाचवा असे आव्हान सामाजिक कार्यकर्ते सुरेखा जाधव यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे. 

No comments