Breaking News

संचारबंदीच्या पार्श्वभूमीवर केजमध्ये पोलिसांचे पथसंचलन


गौतम बचुटे । केज 

कोरोना संसर्ग रोखण्यासाठी राज्यात लॉक डाऊन असून अत्यावश्यक सेवा वगळता संचारबंदी सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर केज शहारात पोलिसांनी पथसंचलन केले.


राज्यात कोरोना संसर्ग दिवसेंदिवस वाढत असल्याने मुख्यमंत्री ना. उद्धव ठाकरे यांनी कोरोनाची साखळी तोडण्यासाठी दि. १५ एप्रिल पासून १ मे पर्यंत लॉक डाऊन जाहीर केला आहे. त्यामुळे अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार बंद असून अनावश्यक गर्दी टाळण्यासाठी संचार बंदी सुरू आहे. तरी देखील काही नागरिक अनावश्यकरित्या घराबाहेर पडून कोरोना संसर्ग पसरवीत आहेत. अशांना कायद्याचा धाक निर्माण व्हावा आणि गैरप्रकार थांबविण्यासाठी; तहसीलदार दुलाजी मेंडके आणि पोलीस निरीक्षक प्रदीप त्रिभुवन, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. विकास आठवले, नायब तहासिलदार सचिन देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली केज शहरातील प्रमुख मार्गावरून पथ संचलन केले. यात सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष मिसळे, पोलीस उपनिरीक्षक दादासाहेब सिद्धे, पोलीस उपनिरीक्षक श्रीराम काळे यांच्यासह दंगल नियंत्रण पथक, पोलीस कर्मचारी व अधिकारी, गृह रक्षक दलाचे जवान सहभागी झाले होते. हे पथसंचलन शिवाजी चौक, कानडी रोड, बस स्टँड, मंगळवार पेठ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, रोजा मोहल्ला या प्रमुख मार्गावरून करण्यात आले.

" नागरिकांनी सॅनिटायझर, मास्क, सोशल डिस्टनसिंग आणि घराबाहेर न पडणे या चार बाबींचा अवलंब करावा अन्यथा कार्यवाही अटळ असल्याचे तहसीलदार दुलाजी मेंडके म्हणाले. 

 

" कोरोना संसर्ग वाढत असल्याने नागरिकांनी घराबाहेर पडू नये. सबळ कारण नसताना आढळून आल्यास कायदेशीर कठोर कार्यवाही करण्यात येईल. "असे पोलिस निरीक्षक प्रदीप त्रिभुवन म्हणाले.

No comments