कडा दलित वस्तीतील सार्वजनिक शौचालयात अनेक समस्या
ग्रामपंचायत ने समस्या सोडाव्यात अशी महिलांची मागणी
कडा : येथिल दलित वस्तीतील सार्वजनिक शौचालयाच्या हौदातून बाहेर पाणी जाण्यासाठीचे पाईप गटारीला न जोडता शौचालयाच्या परिसरातच शौस खड्डा घेऊन त्यात पाणी सोडले आहे परंतू तो शौस घड्डा पुर्णपणे भरलेला असल्यामुळे शौचालयाच्या हौदातुन व चेंबर मधून घाणी पाणी बाहेर येत आहे त्यामुळे या परिसरात दुर्गधी सुटली असून शौचालयात महीलांना जाण्या - येण्यासाठी कसरत करावी लागत आहे.
तसेच या परिसरात मोठी मरकूरी लावावी पाण्यासाठी बोअर किंवा हातपंपाची सोय करावी कारण सध्या जी सोय पाण्यासाठी केली आहे त्यातून पाणीपुरवठा कधीतरीच होतोय या शौचालयाच्या इमारतला चिटकून मधून एक भिंती बनवून पुरुषांसाठी व महीलांसाठीचे असे दोन भाग करा.व तेथे पुरुषांसाठी महिलांसाठी असे ठळकपणे दिसणारे फलक लावावे अशी मागणी या परिसरातील सर्व महिलां करीत आहे तरी यांची दखल कडा ग्रामपंचायतने घ्यावी व सार्वजनिक शौचालय समस्या मुक्त करावे.
No comments