Breaking News

बीड जिल्ह्यातील कोरोना योद्ध्यांची वेतन थकल्याने दोन महिन्यांपासून उपासमारआरोग्य मंत्रीआणि पालकमंत्र्यांनी लक्ष देण्याची गरज : मनोज वाघमारे


बीड : बीड जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना या रुग्णांचे जीव वाचवण्यासाठी रात्रंदिवस अहोरात्र मेहनत घेणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांवर शासनाने दुर्लक्ष केल्याचे चित्र पहायला मिळत आहे.बीड जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या अंतर्गत काम करणारे आरोग्य कर्मचारी तथा कोरोना योद्धे दोन महिन्यांपासून वेतन विनाच आपली आरोग्यसेवा इमानेइतबारे बजावत आहेत. मात्र दोन महिन्यांपासून पगार झाली नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली  जिल्हा परिषद अंतर्गत असलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांना दोन महिन्यांपासून वेतन न मिळाल्यामुळे डॉक्टर तुपाशी आणि कर्मचारी उपाशी अशी अवस्था कोरोणा योध्याची झाली आहे.

एकाच प्राथमिक आरोग्य केंद्रात काम करणाऱ्या आरोग्य कर्मचारी, महिला आरोग्य कर्मचारी, औषध निर्माण अधिकारी,जीप चालक आणि शिपाई या संवर्गातील कोरोना योद्ध्यांना मात्र फेब्रुवारी आणि मार्च या दोन्ही महिन्यांचे वेतन अद्याप झालेले नाही.कोरोना च्या पार्श्वभूमीवर कोरोना योग्य म्हणून रात्रंदिवस इमानेइतबारे राबणाऱ्या या आरोग्य कर्मचाऱ्यांवर अक्षरशा उपासमारीची वेळ आली आहे. या कर्मचार्‍यांचे वेतन तात्काळ देऊन त्यांना धीर देण्याची मागणी आरोग्य कर्मचाऱ्यांनी केली आहे.

कोरोनाच्या महामारीत सामान्य नागरीक होरपळून निघत असताना त्यांच्या जीवाची काळजी घेण्याचे काम आरोग्य यंत्रणेमार्फत केले जात आहे.मात्र या यंत्रणेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मागील दोन महिन्यापासून वेतनच मिळाली नसल्याने अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. 

आरोग्य  कर्मचारी आपल्या जीवाची पर्वा न करता गाव पातळीवर जाऊन तपासणी करण्याचे काम करत असतात. मात्र त्या ठिकाणी जाण्यासाठी यांना स्वखर्चाने जावे लागत आहे. मात्र वेतन न मिळाल्याने त्या ठिकाणी त्यांना जाता येत नाही. दोन महिन्यांपासून वेतन नसल्यामुळे मुलांच्या शिक्षणाची फीस देखील भरू शकत नाहीत. त्यांच्या कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांचे वेतन वेळेवर दिले तर ते सामान्य नागरिकांपर्यंत जाऊन तपासणी करून त्यांचे प्राण वाचू शकतात.मात्र हाच आरोग्य कर्मचारी वेतना अभावी उपाशी मरत असेल तर तो इतरांचा जीव कसा वाचवेल? त्यामुळे आरोग्य मंत्री मा. राजेश टोपे आणि पालकमंत्री मा. धनंजय मुंडेयांनी याकडे विशेष लक्ष देण्याची गरज असून बीड जिल्ह्यातील आरोग्य कर्मचाऱ्यांचे वेतन लवकरात लवकर देण्यात यावे अशी मागणी आरोग्य कर्मचाऱ्यांकडून होत आहे.

No comments