Breaking News

श्री क्षेत्र मच्छिंद्रगडाचा नारळी सप्ताह स्थगित आयोजकांची माहिती


बीड
: शिरूर कासार तालुक्‍यातील हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री क्षेत्र मच्छिंद्र गडावर ब्रह्मलीन स्वामी निगमानंद महाराज यांनी प्रारंभ केलेला 43 वा नारळी अखंड हरिनाम सप्ताह यावर्षी नारायणवाडी येथे 17 एप्रिल पासून सुरु होणार होता. परंतु कोरोना प्रतिबंधासाठी सदर सप्ताह स्थगित ठेवल्याचे आयोजकांनी सांगितले. 

    सप्ताहात फक्त विना उभारला जाणार, अन्य सर्व कार्यक्रम प्रवचन, कीर्तन, संगीत भजन व भोजन पंक्ती रद्द केल्या असून, सप्ताह होणार नसल्याचे भाविकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन विद्यमान महंत स्वामी जनार्धन गुरु निगमानंद महाराज यांनी केले आहे.


 वैकुंठवासी स्वामी निगमानंद महाराज यांनी श्री क्षेत्र मच्छिंद्रगडाचा फिरता नारळी सप्ताह सुरू केलेल्या सप्ताहाचे हे 43 वे वर्ष असून, संपूर्ण आयुष्य वैकुंठवासी निगमानंद महाराज यांनी गडाचा भौतिक विकास करत अध्यात्मिक वैभवात भर घालून गडाचा नावलौकिक सर्वदूर केला. परिणामी गडाचा शिष्यपरिवार वृद्धिंगत झाला. सप्ताह काळात सात दिवस हजारो भाविक या आध्यात्मिक मेजवानीला आवर्जून उपस्थित राहतात. प्रतिवर्षी एका गावाला नारळ देऊन त्या सप्ताहाचे यजमानपद दिले जाते. गावकरी मोठ्या उत्साहाने संत सेवा समजून तन-मन-धन खर्ची घालतात.

 गडाचे महंत सात दिवस या गावी मुक्कामी असतात. कीर्तनकार प्रवचनकार गायक वादक भारुड कलाकार तसेच भाविक भक्त सात दिवस थांबून सेवा समर्पित करीत असतात. यावर्षी मात्र हा नारळी सप्ताह सोहळा कोरोना संक्रमण रोखण्यासाठी व भाविकांच्या सुरक्षेसाठी स्थगित केला असल्याचे स्वामी जनार्दन महाराज यांनी सांगितले. ब्रह्मलीन महंत श्री गुरु स्वामी निगमानंद महाराज शिष्य परिवाराने नियोजित सप्ताह असलेल्या गावी येऊ नये व सप्ताह होणार नसल्याचे सांगून भाविकांनी भावनेला आवर घालत घरबसल्याच आपले योगदान व सेवा समर्पित करावी. असे आवाहन महाराजांनी केले आहे.


No comments