Breaking News

आष्टीत भगवान महावीर स्वामी जयंती नवकार महामंत्र जाप करून साजरी

आष्टी : येथे सकल जैन समाजाच्या वतीने दरवर्षी भगवान महावीर जयंती विविध उपक्रमाने साजरी करण्यात येते पण दोन वर्ष पासून देशभरात कोरोना प्रादुर्भाव झाल्यामुळे पुर्ण देशात घबराटीचे वातावरण निर्माण झाले.

आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो ही भावना जोपासुन दरवर्षी भगवान महावीर स्वामी यांची जयंती निमित्त  रक्तदान शिबीर,मोतीबिन्दु शिबीर,समाज उपयोगी व्याख्यान आयोजित करून साजरी केली जाते. जयंती निमीत्त निघणाऱ्या रथयात्रा व मिरवणूक या सर्व बाबींना फाटा देऊन सकल जैन समाजाने एकाच वेळी घरीच थांबुन कोविडचे नियम पाळुन नवकार महामंत्राचा जाप करून जयंती साजरी करण्यात आली.


No comments