Breaking News

देश अन राज्यात ऑक्सिजनचा अन बीड नगरपरिषदेत पाण्याचा तुटवडा


क्षीरसागर कुटुंबाने भाकरीचे वांदे झालेल्या बीडकरांना किमान लॉकडाऊन मध्ये पाणी तरी प्यायला द्यावं - आम आदमी पार्टी

बीड - बीड नगरपरिषद सध्या शासनाची कमी अन क्षीरसागर कुटुंबाची जास्त आहे. मात्र नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, स्थानिक आमदार असलेल्या क्षीरसागरांनी किमान काही देणे नाही झाले तरी शासनानेच पाणी तरी वेळच्या वेळी द्यावी अशी मागणी सर्वसामान्य आम आदमी सध्या करत आहे. भाकरीचे वांदे झालेल्या गोरगरिबांना किमान वेळच्यावेळी पाणी तरी द्यावे अशी मागणी आम आदमी पक्षाचे जिल्हाध्यक्ष व बीडकर या नात्याने अशोक बजरंग येडे यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे केलेली आहे. 

   कोरोनाचा हाहाकार जनतेला जगू द्यायना गेलेला असताना बीडची क्षीरसागर कुटुंबाची सत्ता असलेली नगरपरिषद बीडकरांना तहानलेले ठेवत आहे. सत्तेत सर्व कुटुंबीय असल्याने आता प्रशासनाला पाणी मागण्यापेक्षा क्षीरसागरांना मागावे लागत आहे. 15 दिवसांपेक्षा अधिक काळापासून बीड शहरातील गया नगर, स्वराजनगर काही भाग, अशोकनगर, इस्लामपूरा, मोमीनपुरा, बार्शी नका, तेलगाव नाका, नाळवंडी नाका या भागात पाणीपुरवठा होत नाही. पाणीपुरवठा सुरुळीत करण्यात यावा अन्यथा लॉकडाऊनमध्ये बीडकरांना पाण्यासाठी आंदोलन करण्याची वेळ येऊ शकते. देश अन राज्य ऑक्सिजन साठी तडपडत आहे मात्र बीडला यासोबतच पाणी देखील तडपडवत असून तात्काळ पाणीपुरवठा सुरुळीत करावा अशी मागणी आम आदमी पक्षाकडून करण्यात आली आहे.

No comments