Breaking News

बीड शहराला चार दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात यावा-शेख मेहराज


शेख मेहराज यांची नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, सीईओ यांच्याकडे  मागणी

  

बीड :  मुस्लीम बांधवांचा पवित्र रमजान महिना सुरु आहे तसेच कोव्हीड-19 महामारीचे संकट आणि त्यातच प्रचंड उन्हाळा यात बीड शहरवासियांवर मोठे संकट आहे पाण्याचे अशातच बीड नगर पालिकेकडून सध्या 12 ते 14 दिवसाआड करण्यात येत आहे याचा अर्थ महिन्यातून केवळ दोन वेळा पाणीपुरवठा होत आहे. तरी नागरिकांनी पाण्यावाचून जगायचे तरी कसे? असा प्रश्न  शेख मेहराज यांनी पत्रकाद्वारे उपस्थित केला असून नगरपालिकेचे सीईओ साहेब, नगराध्यक्ष साहेब, उपाध्यक्ष साहेब, पाणीपुरवठा सभापती यांनी या प्रकरणी तात्काळ लक्ष घालावे अशी विनंती त्यांनी पत्रकाद्वारे केली आहे.

पुढे दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, सध्या मुस्लीम बांधवांचा पवित्र रमजान महिना सुरु आहे तसेच कोव्हीड-19 च्या महामारीची प्रचंड लाट अन् प्रचंड उन्हाळा सुरु आहे त्यामुळे शहरवासियांना पाण्यासाठी बाहेर पडता येत नाही याची दखल बीड नगरपालिकेने घ्यावी, बीड शहरात सध्या 12 ते 14 दिवसाआड पाणी येत आहे. पाणी हा माणसाचा जिव्हाळ्याचा प्रश्न आहे पाणी नसेल तर माणूस जगणार तरी कसा त्यामुळे जर बीड नगरपालिकेने 12 ते 14 दिवसाआड पाणी सोडले तर नागरिकांनी पाण्यावाचून राहायचे तरी कसे? असा प्रश्न शेख मेहराज यांनी पत्रकाद्वारे उपस्थित केला आहे. या ज्वलंत प्रश्नांकडे बीड नगरपालिकेचे नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, सीईओ, पाणीपुरवठा सभापती यांनी तात्काळ लक्ष घालावे अशी मागणी शेख मेहराज यांनी केली आहे.

No comments