Breaking News

कोविड संदर्भात मदतीसाठी शिरूर तहसील कार्यालयात कोविड नियंत्रण कक्षाची स्थापना


नागरिकांच्या मदतीसाठी 24 तास नियंत्रण कक्षातील कर्मचारी असणार उपलब्ध

तालुका व्यवस्थापन अधिकारी तथा तहसीलदार श्रीराम बेंडे यांची माहिती

शिरुर का : कोविड संबंधी कुठल्याही मदतीसाठी शिरुर कासार तालुक्‍यातील नागरिकांसाठी येथील तहसील कार्यालयामध्ये 24 तास कोविड नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आल्याची माहिती तालुका आपत्ती व्यवस्थापन अधिकारी तथा तहसीलदार श्रीराम बेंडे यांनी दिली. या नियंत्रण कक्षामध्ये 24 तास कर्मचारी नागरिकांच्या मदतीसाठी उपलब्ध राहतील. तसेच या नियंत्रण कक्षामध्ये पुढील कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. 

१) दिलीप शंकरराव राऊत क.स. लिपिक  (पंचायत समिती शिरूर कासार)  

मो. नं.  94 0 3  48 35  44

2)  विवेकानंद दामोदरराव फुंदे,  क. स. (पंचायत समिती शिरुर का.)  

मो. नं. 84 59 03 71 37

३) डी. एस. भराटे स्था.अ. सं. (सा. बां. विभाग) मो. नं. 95 79 06 30 70 

हे कर्मचारी नियंत्रण कक्षात सकाळी सहा वाजल्यापासून दुपारी दोन वाजेपर्यंत हजर असतील तर दुपारी दोन वाजल्यापासून रात्री दहा वाजेपर्यंत

१) ए. व्ही. मिसाळ सहाय्यक अधीक्षक (तालुका कृषी अधिकारी, कार्यालय शिरूर कासार) मो. नं.  99 21 85 02 58 

२)  एम. के.  शेख वरिष्ठ लिपिक (तालुका कृषी अधिकारी कार्यालय, शिरूर कासार) मो. नं. 94 21 98 80 33

तर रात्री दहा वाजल्यापासून सकाळी सहा वाजेपर्यंत

१) स्वप्नील राम गायकवाड क. स. लिपिक (पंचायत समिती शिरूर कासार) मो. नं. 97 63 46 20 20 

२) एन. एम. जाधव स्था. अ. स. (सा. बां. विभाग)

मो. नं.9673722181

३) बी. जे. सोलार कनिष्ठ लिपिक (सा. बां. विभाग) मो. नं. 9420103006

वरील नियंत्रण कक्षातील नियुक्त कर्मचाऱ्यांनी त्यांना मिळालेल्या संदेशाची नोंदवहीत नोंद घेऊन तहसीलदार मो. नं 9823366090 आणि ना. तहसीलदार महसूल मो. नं 9922622025 तर ना. तहसीलदार महसूल 2 मो. नं 7798482559 व महसूल सहायक मो. नं.  8788173130 यांना तत्काळ माहिती द्यावी असे तहसीलदार बेंडे यांनी आदेशात नमूद केले असून नागरिकांना कोविड संदर्भात कोणतीही मदत हवी असल्यास नियंत्रण कक्षातील नियुक्त कर्मचाऱ्यांना संपर्क करावा असे आवाहन ही तहसीलदार बेंडे यांनी केले आहे. 

No comments