Breaking News

आ.धस पिता-पुञांची हातात भोंगा घेऊन कोरोनावारी आष्टी मतदारसंघ काढला पिंजून


जनजागृती अभियानांतर्गत दिलासा देण्याचे काम

आष्टी :  कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असल्याने पुढील काही महिने नागरिकांनी सतर्क राहण्याची आवश्यकता असल्याने प्रथम प्राधान्य अॕन्टीजन टेस्टची मोहिम गाव-तांडा,वाडी-वस्तीवर राबविली जाणार असल्याने नागरिकांनी यामध्ये उत्स्फुर्तपणे प्रतिसाद देऊन कोरोनाच्या या लढाईत संपूर्ण धस कुटुंब तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे सांगत आ.सुरेश धस हे त्यांचे दोन्ही मुल जयदत्त व सागर धस यांच्यासह स्वताः आष्टी मतदारसंघात हातात भोंगा घेऊन कोरोनावारी करत आधार जनजागृती अभियानांतर्गत दिलासा देण्याचे काम करत आहेत.

मतदारसंघात कोरोनाचा कहर वाढतंच आहेत, कोरोनाची ही साखळी तोडण्यासाठी सर्वांनी पुढे येण्याचे आवाहन करण्यासाठी आ.सुरेश धस यांच्यासह जयदत्त धस व सागर धस यांनी शुक्रवारी सकाळी सात वाजल्यापासून आष्टी मतदारसंघ पिंजून काढला.यावेळी जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, गणप्रमुख, प्रत्येक गावातील प्रमुख कार्यकर्ता यांनी गाव-तांडा,वाडी-वस्तीवर जाऊन गावकऱ्यांना अँटीजन टेस्ट करण्यासाठी जागृत करून हा रोग अंगावर काढण्यासारखा नाही,भीती,बाळगू नका,खोकला, सर्दी-ताप,अंगदुखी डोकेदुखी इत्यादी लक्षणे आढळून आल्यास लवकरात लवकर जवळच्या आरोग्य केंद्रात अथवा रुग्णालयात जाऊन योग्य तो उपचार घेण्याचे आवाहन केले आहे.

आ.सुरेश धस हे आष्टी जयदत्त धस हे पाटोदा तर शिरुर येथे सागर धस यांनी शुक्रवारी सर्व जि.प.गट,पं.स.गण पिंजून काढला आहे.यावेळी नागरिकांना आवाहन करताना कोरोनाविषयी ग्रामीण भागातील लोक जास्त भीती बाळगत आहेत,कृपया कुठलीही भीती न बाळगता आपण अँटीजन टेस्ट करून आरोग्य विभाग व जिल्हा प्रशासनास सहकार्य करावे,तुम्हाला कोरोनाचे संक्रमण झाले म्हणून धीर सोडू नका,तुम्हा सर्वांचे सेवेकरी म्हणून धस कुटुंब आपल्या सोबत असून सर्वांसाठी दिवसरात्र आरोग्य प्रशासन,जिल्हा प्रशासनासोबत चर्चेत आहे.आपल्याला कुठल्याही प्रकारची अडचण निर्माण होणार नाही,कुठलाही संकोच न बाळगता अडचण सांगा आमचे कुटुंब तसेच प्रमुख कार्यकर्ते आपल्या सेवेसाठी सदैव तत्पर आहेत म्हणत नागरिकांना धीर देण्याचे काम धस कुटुंब या दौऱ्याच्या माध्यमातून करीत आहे.

भोंगा आणि माईक बरोबरच

आ.धस पिता-पुञ हे कोरोनाची जनजागृती निमित्त आष्टी मतदारसंघ पिंजून काढत आहेत.विशेष म्हणजे आ.सुरेश धस यांच्यासह त्यांचे दोन्ही मुले या दौऱ्यात स्वतःच माईक आणि साऊंड हातात घेऊन गावातील नागरिकांना आवाहन करीत आहे.त्यामुळे जनसेवेचा ध्यास असल्यानंतर माणूस कोण आणि कोणत्या पदावर आहे हे विसरुन मी फक्त जनतेचा सेवक आहे हि भावना लक्षात घेऊन आ.धस यांच्या कुटुंबाचे असलेले कोरोना काळातील योगदान अभिनंदनास पाञ असल्याच्या भावना लोक बोलून दाखवित आहे.

या दौऱ्यात मच्छिंद्रनाथ देवस्थानच्या वतीने अॕन्टीजन कॕम्प हे मोफत लावण्यात येणार आहेत.या टिमचा खर्च मच्छिंद्रनाथ गड देवस्थान करणार आहे त्यामुळे नागरिकांनी भीती न बाळगता पुढे येणे गरजेचे आहे असे सांगत प्लाझ्मा दान करण्याची मोहिम देखील मोठ्या प्रमाणात राबविण्याची गरज असल्याचे मत यावेळी या मान्यवरांकडून सांगण्यात येत आहे.


No comments