Breaking News

प्रियदर्शी व सम्यक संकल्प च्या वतीने व्याख्यानमालेचे आयोजन


बीड :  क्रांतीबा ज्योतिबा फुले व भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती निमित्ताने दिनांक 11 एप्रिल 2021 ते 17 एप्रिल 2021 रोजी प्रियदर्शी धम्म संस्कार शिक्षण संस्था बीड व सम्यक संकल्प समता पर्व बीड च्या वतीने सात दिवसीय व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. कोरोनाविषाणू चा वाढता संसर्ग लक्षात घेता व महापुरुषांची विचारधारा तळागळापर्यंत सातत्यपूर्वक पोहोचत राहावी म्हणून या व्याख्यानमालेचे आयोजन सम्यक संकल्प फेसबुक लाईव्ह पेज वरून ऑनलाइन होणार आहे. रोज रात्री 8:00 वाजता कार्यक्रमाचे लाईव्ह प्रक्षेपण होणार असून दि. 11/04/2021 रोजी, महात्मा फुले यांची सामाजिक चळवळ या विषयावर मा. प्रा. डॉ.संदेश वाघ (प्रख्यात इतिहासकार,मुंबई विद्यापीठ),दि.12/04/2021 रोजी, काल्पनिक अनुमानावर आधारलेला धर्म हा अ-धम्म आहे. या विषयावर भदंत डॉ. उपगुप्त महाथेरो (पूर्णा), दि.13/04/2021 रोजी,मानवी जीवनात सदाचरणाचे महत्व. या विषयावर भिक्खु धम्मशिल (बीड/ हिंगोली), दि. 14/04/ 2019 रोजी, बुद्ध भीम गीतांचा सांस्कृतिक कार्यक्रम.सादरकर्ते - प्रा. दीपक जमदाडे आणि संच (बीड). इत्यादी मान्यवर महापुरुषांच्या विचारधारेची आपली भूमिका मांडणार आहेत.

मागील एक वर्षापासून सर्व महापुरुषांच्या जयंती व पुण्यस्मरण साजरे करताना त्यांची विचारधारा सर्व समाजापर्यंत पोचविण्याचे कार्य सम्यक संकल्प समता पर्व फेसबूक लाईव्ह च्या माध्यमातून थेट प्रक्षेपण करून प्रबोधनात्मक करत आहे. क्रांतीबा ज्योतिबा फुले व प्रज्ञासूर्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करताना त्यांचे दैदिप्यमान कार्य सर्वांना प्रेरणादायी ठरते,हीच प्रेरणा सर्वांमध्ये तेवत राहावी व त्यांच्या विचारांची प्रेरणा खऱ्या अर्थाने प्रत्येकाच्या मनात प्रज्वलित व्हावी व त्यांच्या विचारांचा जागर तेवत राहावा म्हणून व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आलेले आहे. तरी या व्याख्यानाचा लाभ घेण्यासाठी सर्वांनी आपले मित्र परिवार, नातेवाईक, सर्व सामाजिक संघटना पदाधिकारी यांना या कार्यक्रमाची माहिती देऊन लाभ घ्यावा असे सूचित करावे. असे आवाहन प्रियदर्शी धम्म संस्कार शिक्षण संस्था बीड व सम्यक संकल्प समता पर्व फेसबुक लाईव्ह बीड च्या वतीने करण्यात आले आहे.

No comments