Breaking News

केज तालुक्यात विवाहितेची आत्महत्या : मारहाण करून खून केल्याचा माहेरच्या मंडळींचा आरोप


गौतम बचुटे । केज 

केज तालुक्यातील पिंपळगाव घोळवे येथील एका विवाहितेला गाडी घेण्यासाठी माहेरहून पैसे घेऊन ये म्हणून सासरच्या लोकांच्या शारीरिक व मानसिक छळाला कंटाळून विष प्राशन करून आत्महत्या केली. या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल झाला असुन माहेरच्या मंडळीनी तिला मारहाण करून विष पाजून खून केल्याचा आरोप केला आहे. 


या प्रकरणी अधिक माहिती अशी की, केज तालुक्यातील घोळवे पिंपळगाव येथे शोभा रामहरी गायकवाड वय ३० वर्ष या विवाहित महिलेस दि.२२ एप्रिल रोजी सकाळी १०:०० च्या दरम्यान तिच्या सासरच्या लोकांनी माहेरहून गाडी घेण्यासाठी माहेरहून पैसे घेऊन ये म्हणून तिला नेहमी शारीरीक व मानसिक छळ केला तसेच तिला मारहाणं केली. या छळाला कंटाळून शोभा हिने विष प्राशन केले. तिला अंबाजोगाई येथील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिथे तिचे निधन झाले. 

या प्रकरणी मयत शोभा गायकवाडची आई तारामती कोंडीराम भुसारे यांच्या फिर्यादी वरून केज पोलीस ठाण्यात शोभा हिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. केज पोलीस ठाण्यात मयात शोभाचा नवरा रामहरी बालु गायकवाड, सासरा बालु रावसाहेब गायकवाड, दिर किशोर बालु गायकवाड, हिम्मतबालु गायकवाड, जाऊ सविता बातु गायकवाड व नणंद लता गणेश कुटे या सहा जणांच्या विरुद्ध भा. दं. वि. ३०६, ३२३, ३२४, ५०४, ५०६ आणि ३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मयत शोभा हिला एक मुलगा दोन मुली असे तीन अपत्ये आहेत. या प्रकरणी पोलीस निरीक्षक प्रदीप त्रिभुवन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक श्रीराम गायकवाड हे पुढील तपास करीत आहेत.


No comments