Breaking News

परिचारिका परीक्षेमध्ये दशरथ घुले महाराष्ट्रातून अव्वल क्रमांक मिळवला


स्वा.रा.ती. रुग्णालयीन कर्मचाऱ्यांकडून सत्कार करण्यात आला

शिवाजी भोसले । अंबाजोगाई

बीड जिल्ह्यातील परळी वैजनाथ येथे नर्सिंग चे शिक्षण पूर्ण करून गेली दोन वर्षापासून अंबाजोगाई येथे सातत्याने स्पर्धा परीक्षेची तयारी करत होते.सार्वजनिक आरोग्य विभाग अंतर्गत परिचारिका परीक्षेमध्ये याने २०० पैकी १७२ गुण मिळवून महाराष्ट्र राज्यातून प्रथम क्रमांक पटकावला असून सर्व स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे. विशेष म्हणजे विद्यार्थी घडतो तो शिक्षक म्हणजे गुरू पासून तसेच या इन्स्टिट्यूट मध्ये विद्यार्थी घडविण्यासाठी कै. रघुनाथराव केंद्रे इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग परळी वैजनाथ यांनी मोलाचे मार्गदर्शन केले.

सार्वजनिक आरोग्य विभाग, विद्यार्थी दशरथ सटवाराव घुलेशासनामार्फत २८ फेब्रुवारी २०२१ ला परिचारिका ( staff nurse) या पदासाठी घेण्यात आलेल्या स्पर्धा परीक्षेत महाराष्ट्र राज्यातील सुमारे २५००० विद्यार्थ्यांमधून दशरथ सटवाराव घुले महाराष्ट्र मधून अव्वल क्रमांक पटकावला मुळे त्यांच्या स्वा.रा.ती.मेडिकल परिसर अंबाजोगाई येथे सत्कार करण्यात आला या सत्कार प्रसंगी वरिष्ठ सहाय्यक लिपिक वसंत वनवे, सचिन नागरगोजे पत्रकार संतोष केंद्रे, पत्रकार देविदास जाधव, नितीन मोराळे,  मुख्याध्यापक सुंमत केदार सर आदि लोकांनी सत्कार करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

No comments