Breaking News

कोरोना विरोधात चेक पोस्टवर लढणारे पोलीस आणि आरोग्य कर्मचारी ऊन वारा पावसात उघड्यावरच !


कमीत कमी चेक पोस्ट वरील कर्मचारी आणि वायरलेस यंत्रणेच्या साहित्याला निवारा हवा

गौतम बचुटे । केज 

कोरोनाशी युद्ध करण्यासाठी पहिल्या आघाडीवर लढत असलेले पोलीस आणि आरोग्य यंत्रणेचे कर्मचारी हे चेक पोस्टवर अक्षरशः उघड्या आहेत. ऊन वारा व पावसा पासून त्यांचा बचाव करण्यासाठी निवारा शेड व  तात्पुरते प्रसाधन गृह आवश्यक आहे.

लॉक डाउन काळात जिल्हा हद्दीत कोणी परवानगी शिवाय प्रवेश करू नये. ज्यामुळे जिल्ह्यात कोरोना विषाणूचा संसर्ग फैलावू नये म्हणून रात्र न दिवस डोळ्यात तेल घालून पहारा देत असलेले पोलीस व शिक्षण विभागाचे कर्मचारी पहारा देत आहेत. या चेक पोस्ट वरून जिल्हा हद्दीत प्रवेश होतो अशा मांजरा नदी पुलावर आणि बोरगाव चौफळ्यावर केज प्रशासनाने चेक पोस्ट उभारले आहेत. 

या चेक पोस्टवर बंदोबस्तासाठी केज आणि युसूफवडगाव पोलीस स्टेशनचे कर्मचारी, आरोग्य कर्मचारी चोवीस तास कर्तव्य बजावतात. येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांची व व्यक्तींची नोंद घेण्यासाठी शिक्षण विभागातील कर्मचारी हे देखील काम करतात. उन्हाळ्यात चेक पोस्ट जवळच्या झाडाच्या सावलीत किंवा तात्पुरत्या छपरात बसून या सर्वांनी आपले काम चोख बजावले आहे. रात्री तर अक्षरशः उघड्यावर चटई पसरून रात्र पाळीवरील कर्तव्यावर असलेले कर्मचारी यांनी रात्र काढली आहे. 

मात्र दिन दिवसांपासून मान्सूनपूर्व अवकाळी पाऊस पडायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे चेक पोस्टवरच्या कर्मचाऱ्यांची तारांबळ उडाली असून पडत्या पावसात रात्रभर भिजून आपले कर्तव्य बजवावे लागत आहेत. येथे प्रसाधनगृह किंवा निवारा नसल्यामुळे कपडे बदलणे व नैसर्गिक विधीसाठी त्यांची कुचंबणा होत आहे. येथील कर्मचाऱ्यांना उन, वारा व पासपासून बचाव करण्यासाठी निवारा शेड आणि तात्पुरत्या स्वरूपाचे प्रसाधन गृह असावे. अशी मागणी सुज्ञ नागरिकांतून होत आहे. तसेच या चेक पोस्टवर मुख्यालयाशी संपर्क साधण्यासाठी बिनतारी संदेश यंत्रणा आणि सीसीटीव्हीची मशिनरी व साहित्य असल्याने त्यांचे देखील पावसापासून संरक्षण होण्यासाठी व्यवस्था व्हायला हवी.


No comments