Breaking News

अल्पवयीन मुलीवर अत्याचार ; आरोपीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या


माजलगाव: जागरण- गोंधळाच्या कार्यक्रमात एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्यात आल्याचा प्रकार १ जानेवारी रोजी शहरात घडला होता. दरम्यान पीडितेच्या फिर्यादीवरून ९ एप्रिल रोजी आरोपी विरोधात माजलगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. आरोपीस पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

दाखल करण्यात आलेल्या फिर्यादीनुसार १ जानेवारी २०२१ रोजी फिर्यादीच्या काकाच्या घरी जागरण गोंधळाचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता.या कार्यक्रमानिमित्त साळापूर जिल्हा परभणी येथील पीडितेचा नातेवाईक (बबलू) नवनाथ बनसोडे वय २२ वर्षे हा आला होता. या कार्यक्रमानिमित्त पीडिता प्रसाद बनवत असताना शिवराज उर्फ बबलू तिच्याजवळ आला.व तिच्या कानात म्हणाला मला तुझ्याजवळ काम आहे बाजूच्या प्रकाश काकाच्या घरात चल.यावेळेस पीडिता त्याच्या सोबत प्रकाश काकाच्या घरात गेली असता शिवराज उर्फ बबलू याने पीडितेवर जबरदस्ती अत्याचार केला. व कोणाला सांगितले तर जिवे मारून टाकील अशी धमकी दिली.दरम्यान पीडितेने ९ जानेवारी रोजी प्रत्यक्ष पोलीस ठाण्यात हजर होऊन रात्री साडे सहा वाजता शिवराज उर्फ बबलू नवनाथ बनसोडे यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे. पीडितेच्या फिर्यादीवरून शिवराज उर्फ बबलू नवनाथ बनसोडे याच्याविरुद्ध भादवि ३७६ सह बाललैंगिक अत्त्याचार कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.प्रकरनाचा पुढील तपास स.पो.नि.निता गायकवाड़ ह्या करत आहेत. आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहे.

No comments