Breaking News

राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघाच्या आंदोलनाला यश ..!


बीड : महाराष्ट्र राज्यामध्ये पदोन्नतीतील कोट्यातील रिक्त पदे खुल्या संवर्गातून भरण्याचा शासन निर्णय दिनांक 18 फेब्रुवारी 2019 रोजी निघाला होता त्याच्या विरोधात राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघ या ट्रेड युनियन द्वारे महाराष्ट्रामध्ये दिनांक 22 मार्च 2021 ला मुख्यमंत्र्यांना व 309 तहसील मध्ये काळी फीत लावून निवेदन देण्याचे आंदोलन करण्यात आले होते.

आंदोलनाची दखल महाराष्ट्र सरकार द्वारे घेतली गेली. महाराष्ट्र सरकार द्वारे त्याच तारखेला 22 मार्च 2021 ला आरक्षण निश्चित करण्याच्या संदर्भात समिती गठित करण्यात आली पण 18 फेब्रुवारी 2021 चा शासन निर्णय रद्द झाला. नव्हता गठित केलेल्या समितीद्वारे योग्य निर्णय येण्याची अपेक्षा आणि  25 मे 2004 च्या शासन निर्णयाला लागू करून पदोन्नती मधील आरक्षणातील रिक्त पदे भरण्याची मागणी संघटनेने आंदोलन करून केली होती. दिनांक. 06 एप्रिल 2021 राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघ राज्य शाखा द्वारे महाराष्ट्र राज्य सरकारला 18 फेब्रुवारी 2019 चा शासन निर्णय पदोन्नतीतील पदे खुल्या प्रवर्गातून भरण्याचा शासन निर्णय रद्द करत नव्हते तर संघटन संपूर्ण महाराष्ट्रामध्ये रस्त्यावर उतरून आंदोलन करेल याचे सूचना पत्र दिले होते. आज 20 एप्रिल 2021 ला 25 मे 2004 च्या शासन निर्णयानुसार पदोन्नती करण्याचा शासन निर्णय निर्गमित केला आहे. 


संघटन महाराष्ट्र राज्य शासन आणि मा. मुख्यमंत्री महोदय यांचे आभारी आहे आता संघटन ही मागणी करत आहे की एस सी, एसटी ,ओबीसी , एन टी,  एस बी सी आणि व्हीजेएनटी कर्मचारी - अधिकारी यांना पदोन्नत करण्याची प्रक्रिया लवकरात लवकर सुरू करावी. राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघ मुख्य शाखा आणि राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघ उपशाखेच्या लाखो कार्यकर्त्यांना हे आंदोलन यशस्वी करण्यासाठी कोरोनाच्या काळात लढले अशा सर्व कार्यकर्त्यांचे संघटनेच्या वतीने आभार मानण्यात आले आहेत. 

जो लोग लढते है वह जीतने की उम्मीद रखते है !

आता आपले आंदोलन या देशातील शेतकरी ,मजूर ,कामगार, युवक ,बेरोजगार ,विद्यार्थी, कर्मचारी यांचे अधिकार वाचवण्या च्या उद्देशाने दिनांक 19 एप्रिल 2021 ते 1 मे 2021 पर्यंत निश्चित आहे जे राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघ केंद्रीय शाखा भारत द्वारे राष्ट्रीय स्तरावर सुरू केले आहे.  जवळपास एक करोड लोक यात सहभागी आहेत.  या आंदोलनाला यशस्वी होण्याच्या उद्देशाने भारतातील 500 डिपारमेंट मधील कर्मचारी सहभागी आहेत.

जिद्द से लुडो,सफलता हमारे कदम चुमेगी !

परत एकदा आपल्या सर्वांचे आभार आणि राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघ कमिटी चे विशेष आभार जे संपूर्ण भारत देशातून या महाराष्ट्र राज्याच्या आंदोलनाला यशस्वी होण्यासाठी साथ सहयोग केला. 


No comments