Breaking News

कोरोना परिस्थितीत थम (अंगठा) न घेता धान्य वाटप करावे - डॉ. शिवाजी राऊत

आष्टी : दिवसेंदिवस कोरणाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत चालला असून सर्वसामान्य लोकांचे हाल होत आहेत यामध्येच ग्रामीण भागामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात कोरणा रुग्ण आढळून येत असल्याने सामान्य लोकांना रेशन दुकानातून थम(आंगठा) देऊन धन्य घेणे शक्य होत नाही त्यामुळे  कोरोणा परिस्थितीमध्ये राज्य सरकारने हाताचा अंगठा  न घेता पात्र व गरजू लाभार्थ्यांना राशन वरील धन्य वाटप करावे अशी मागणी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष डॉक्टर शिवाजी राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अन्न व पुरवठा मंत्री छगन भुजबळ पालकमंत्री धनंजय मुंडे जिल्हाधिकारी बीड आमदार बाळासाहेब आजबे यांच्याकडे निवेदन देऊन मागणी केली आहे.


       ग्रामीण व शहरी भागांमध्ये मोठ्या प्रमाणात कोरोनाचे रुग्ण संख्या वाढत आहेत, या पार्श्‍वभूमीवर कुटुंबातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्यास त्या कुटुंबातील व्यक्तींना घराबाहेर पडणे शक्य होत नाही अशामध्ये जर पॉझिटिव्ह रुग्ण हे राशन दुकानावर आनण्यासाठी गेल्यास कोरणा चा संसर्ग वाढण्याची खूप शक्यता आहे. त्यामुळे या कोरोना परिस्थितीमध्ये थम हाताचा अंगठा न घेता कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीकडे त्या महिन्याचे राशन देण्याची सोय शासनाने करावी जेणेकरून कोरोनाचा प्रसार होणार नाही, या बाबत दक्षता घेता येईल व होणारा कोरूना संसर्ग टाळता येईल ,त्यामळे शासनाने तातडीने आदेश काढून  याबाबत कार्यवाही करावी अशी मागणी महाराष्ट्र राज्य राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेलचे प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी जिप अध्यक्ष डॉक्टर शिवाजी राऊत यांनी शासनाकडे केली आहे.

No comments