Breaking News

राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे मास्कचे वाटप करून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती केली साजरी

गौतम बचुटे । केज

भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार विश्ववंदनीय डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या १३० व्या जयंती निमित्त महात्मा फुले केज येथील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या संपर्क कार्यालयात महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करण्यात आली.

या प्रसंगी डॉ.आंबेडकरांच्या प्रतिमेस जेष्ठ नेते गंगाधर सिरसट, विशाल मस्के व मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. तसेच प्रभाकर सिरसट यांच्या वाणीतून त्रिसरण-पंचशील ग्रहण करून वंदन करण्यात आले. या प्रसंगी परिसरातील सर्व जेष्ठ मान्यवर, स्नेही मार्गदर्शक, मित्रपरिवार व भीम अनुयायी उपस्थित होते. या मंगलदिनाचे औचित्य साधून परिसरातील उपस्थितांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष बजरंग बप्पा सोनवणे यांच्या संकल्पनेतून युवा कार्यकर्ते आकाश भैय्या गायकवाड यांच्या वतीने कोरोना महामारीच्या विरोधात लढण्यासाठी अत्यावश्यक असलेले शस्त्र म्हणजेच 'मास्क' चे वाटप करण्यात आले. कोरोना महामारीचा वाढता प्रादुर्भाव पाहता या वर्षी जयंती ही खूप साधेपणाने व मोजक्या नागरिकांच्या उपस्थितीत साजरी केली. 

नागरिकांच्या उत्तम आरोग्याच्या दृष्टीने शासनाने घालून दिलेले नियम पाळणे आवश्यक आहे. म्हणूनच या वर्षी भीम अनुयायांनी जयंती साजरी करण्याचा उत्साह आवरून शासनाने केलेल्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत परमपूज्य बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याला आणि विचारांना कृतज्ञतापूर्वक अभिवादन करून जयंती साजरी केली. या कार्यक्रमास श्रीकांत उजगरे सर, सुदेश सिरसट, पप्पू दुनघव, प्रा. सचिन वाघमारे, रवी बाबर, प्रा. प्रशांत जाधव, नितीन धिवार, भाऊसाहेब पाचपिंडे, अजित सोनवणे, गोविंद ठोंबरे, अमित डापकर, अमर गालफाडे, जतीन धिवार, अजय लोंढे, ऋषिकेश सिरसट, प्रेम मस्के, केतन घोडके, प्रशांत गालफाडे, दिनेश साळवे, भैय्या सुरवसे  कार्यक्रमाचे आयोजक राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा कार्यकर्ते आकाशभैय्या गायकवाड यांच्यासह आदी नागरिक उपस्थित होते.

No comments