Breaking News

कोरोना विषाणू पासून आपली व आपल्या परीवारीची काळजी घ्या : पोलीस निरीक्षक सुरेखा धस


धारूर :  कोरोना विषाणूचा जोर वाढत असून, दुसऱ्या लाटेमध्ये आकडेवारी खूपच वाढु लागली आहे.कोरोणा या रोगाने जगात थैमान घातले आहे. दररोज बाधितांची संख्या मोठ्या आकड्यांनी वाढत आहे. यामुळे आपण सर्वांनी स्व:ची व आपल्या कुटुंबाची काळजी घ्यावी. आवश्यक असेल तरच बाहेर पडावे, घरातील लहान मुले आणि वयोवृद्धांना सांभाळा व खालील मुद्द्ये लक्षात ठेवून योग्य वापर करावा.  

    

1) सॅनिटायझर मास्कचा नियमित वापर करा.

2) सोशल डिस्टनसिंगचा वापर करा.

 3) ताप, सर्दी, खोकला, घसा दुखत असेल तर तात्काळ वैद्यकीय सल्ला घ्यावा.

5) कोव्हीड-19 चाचणी केली असेल तर रिपोर्ट येईपर्यंत विलगिकरणात राहावे, बाहेर फिरू नये.

    कोरोणाच्या भंयकर रोगामुळे  बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती  साध्या पद्धतीने करावी.आपण आपल्या कुटुंबासाठी महत्वाचे आहोत,हे लक्षात घेऊन प्रत्येकाने जवाबदारीने वागले पाहिजे.शासन प्रयत्न करत आहे.प्रयत्नाला आपला प्रतिसाद देऊन,कोरोना महामारीला हद्दपार करूया असे आव्हान धारूर च्या  कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून परिचित असलेल्या सह पोलीस निरीक्षक सुरेखा धस यांनी केले आहे.

No comments