Breaking News

कडा शहराचे लसीकरण वॉर्डनिहाय करावे- शंकर देशमुख


कडा : कडा शहराची लोकसंख्या पाहता कडा शहराचे लसीकरण हे वार्ड निहाय करण्यात यावे अशी मागणी बीड जिल्हा भारतीय जनता पार्टीचे जिल्हा सचिव श्री शंकर देशमुख यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे जिल्हा आरोग्य अधिकारी व तालुका आरोग्य अधिकारी यांच्याकडे केली आहे. 

   कडा शहराची लोकसंख्या ही जवळपास पंधरा हजाराच्या आसपास असून कडा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अंतर्गत जवळपास बावीस गाव येत आहेत शासनाकडून कडा प्राथमिक आरोग्य केंद्राला दोनशे ते अडीचशे लस उपलब्ध होतात आणि या सर्व गावांची एकाच वेळी प्राथमिक आरोग्य केंद्राकडे गर्दी होते या गर्दीमुळे कोरोणाचा धोका मोठ्याप्रमाणात संभव होत आहे आणि म्हणून कडा शहराचे लसीकरण हे वेगळे करण्यात यावे प्रत्येक वार्ड मध्ये या लसीकरणाची व्यवस्था केली जावी प्रत्येक वार्डा मधे प्राथमिक शाळा व अंगणवाडी आहेत यामध्ये ही व्यवस्था केली जाऊ शकते वार्ड निहाय लसीकरणाची योजना राबविल्यास एकावेळी गर्दी होणार नाही आणि कोरोणाचा धोकाही वाटणार नाही त्यात्या वार्डातील लोकप्रतिनिधी असतील, आशा सेविका असेल व इतर स्वयंसेवी संस्था असतील या संस्था प्रत्येक वार्डात ती व्यवस्था केली जाईल यापूर्वी शासनाने पल्स पोलिओ लसीकरण हे प्रत्येक केंद्रावर केले आहे आणि म्हणूनच आमची मागणी अशी आहे.

ती कडा गावात सहा वार्ड असून सहा वार्डाचे लसीकरण हे वेगळे केले जावे वॉर्डनिहाय लसीकरण केल्यास वृद्ध नागरिक असतील महिला असतील या सर्वांना प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जाण्याचा त्रास वाचेल आणि लसीकरणाचे उद्दिष्टही साध्य होईल कडा प्राथमिक आरोग्य केंद्र गावापासून एक किलो मीटर असून या ठिकाणी 22 गावचे लोक आल्याने कोरोणाचा धोका वाढणार आहे आणि म्हणून माननीय जिल्हा अधिकारी जिल्हा आरोग्य अधिकारी व तालुका आरोग्य अधिकारी यांनी सर्व गोष्टींचा विचार करून कडा शहराचे वार्ड निहाय लसीकरणाचे त्वरित नियोजन करावे व कडा शहरासाठी विशेष लसीचा साठा उपलब्ध करून द्यावा अशी आग्रही मागणी शंकर देशमुख यांनी पत्रकात केली आहे. 


No comments