Breaking News

साळेगाव येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी


गौतम बचुटे । केज 

केज तालुक्यातील साळेगाव येथे भारत रत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली.

या बाबतची माहिती अशी की, साळेगाव ता. केेेज येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त झेंडे व विद्युत रोषणाई करून आणि पूर्व संध्येला शोभेच्या दारूची आतिषबाजी करण्यात आली. दि.१४ एप्रिल रोजी सकाळी ९:३० केज पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष मिसळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यात आले.

 या वेळी सरपंच कैलास जाधव, उपसरपंच अमर मुळे, सेवा सहकारी सोसायटीचे व्हाईस चेअरमन लिंबाजी बचुटे, रवींद्र जोगदंड, संभाजी सरवदे, सूर्यकांत काळे, रावसाहेब बचुटे, अविनाश सरवदे, रोशन सरवदे, अमित बचुटे यांच्यासह डॉ. आकाश बचुटे, ज्योतिराम बचुटे, पोलीस कर्मचारी अशोक नामदास, दिलीप गीते, हनुमंत गायकवाड, महादेव गायकवाड, अँड बाळासाहेब मुळे, संभाजी शिनगारे हे उपस्थित होते. यावेळी सोशल डिस्टन्स आणि कोरोनाचे सर्व नियम पाळून मास्क व सॅनिटायझर याचा वापर करून सर्व कार्यक्रम मोजक्याच प्रमुख कार्यकर्ते आणि प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थिती संपन्न करण्यात आला.

No comments