Breaking News

माजी आमदार भीमसेन धोंडे यांनी कोरोना ग्रस्तांसाठी केली भोजनाची व्यवस्था


आज पासून अन्नदानाला केली सुरवात

मुख्यमंत्री सहाय्यता निधीला एक लाखांची मदत- 

शिरूर कासार : कोरोना आजाराची लक्षणे असणाऱ्या शिरूर तालुक्यातील नागरिकांना शहरातील शासकीय निवासी शाळेत कोविड केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या नागरिकांना माजी आमदार भीमसेन धोंडे यांच्या वतीने भोजनाच्या डब्याची व्यवस्था करण्यात आली असून अन्नदान वाटपाचा शुभारंभ आज कोविड केअर सेंटर मध्ये करण्यात आला असून मुख्यमंत्री सहाय्यता निधीला एक लाखांची मदत करण्यात आली आहे. 

या वेळी माजी आमदार भीमसेन धोंडे यांच्यासह तालुका आरोग्य अधिकारी डॉ.अशोक गवळी यांच्यासह जि. प. सदस्य रामराव खेडकर, बाबुराव केदार, रामदास बडे, स्वीय सहाय्यक भागवत वारे, दत्ता भुजबळ, सरपंच देवा गर्कळ, एम. एन. बडे, संजय शिरसाट, किशोर खोले, अजिनाथ गवळी, सावळेराम जायभाये, माऊली पानसंबळ, कालिदास आघाव, माणिक कातखडे यांची उपस्थिती होती. पुढे बोलताना ते म्हणाले की,कोरोनाची परिस्थिती दिवसेंदिवस भयानक होत असून कोविड केंद्रात उपचार घेत असलेल्या मतदारसंघातील तिन्ही तालुक्याच्या नागरिकांना आपण अन्नदानाची सेवा करण्याचा निर्णय घेतला आहे.

भारतीय संस्कृती मध्ये अन्नदान हे सर्वश्रेष्ठ दान आणि पुण्यकर्म समजल्या जाते.राज्यातील सत्ताधारी पक्षाच्या एकाही लोकप्रतिनिधीने मुख्यमंत्री सहाय्यता निधीला मदत केली नाही.माणुसकीचे कर्तव्य म्हणून आपण समाजाचे काही तरी देणे लागतोत या भावनेने एक लक्ष रुपयांचा धनादेश जिल्हाधिकारी यांच्याकडे सुपूर्द करणार असल्याचे त्यांनी सांगितले. या वेळी त्यांनी तालुक्यातील कोरोना रुग्ण आणि त्यांच्या आजाराची स्थिती या विषयी तालुका आरोग्य अधिकारी डॉ.अशोक गवळी यांच्याकडून आढावा घेतला.

No comments