Breaking News

खासगी शिक्षकांना शाळेवर बोलावण्याची गरज काय? प्रवासामुळे शिक्षक धोक्यात : शिक्षक नेते भारत तोंडे


बीड :  बीड जिल्ह्यात कोरोनाचे रूग्ण झपाट्याने का वाढु लागले? याची वेगवेगळी कारणे डोळ्यासमोर दिसत असुन शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्याचे आदेश शासनाने दिले असताना खासगी शिक्षण संस्थाचालक आपल्या संस्थेतील शिक्षकांना अनेक कारणास्तव शाळेत रोज बोलवु लागले. ज्यामुळे शिक्षकांना रोज प्रवास करत याव लागतं, परत जावं लागतं. ज्याचा धोका संसर्ग वाढण्यावर होतो आणि घरात शिक्षक बाधित झाला की कुटुंबाला वेढा पडतो. जिल्हाधिकारी बीड यांनी थोडंसं बारकाईनं वाढता कोरोना रोखण्यासाठी लक्ष घालण्याची गरज आहे. ऑनलाईन कामं घरी बसुन करता येतात. मग शाळेवर कशाला बोलवता?10वी, 12वीच्या परीक्षा असल्या तरी मर्यादित संख्या पुरेशी होवु शकते. असे शिक्षक नेते भारत तोंडे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

पत्रकात म्हटले आहे की, बीड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर खासगी शिक्षण संस्थेचं जाळं आहे. शिक्षण व्यवस्थेत शिक्षकही मोठ्या संख्येने शिक्षकेत्तर कर्मचारी सारे मिळवुन पकडले तर जिल्ह्यात नाही म्हटलं तरी हजारोंच्या संख्येत आकडे आहेत. सद्याचा कोरोना गंभीर स्वरूपाचा आहे. संक्रमण मोठ्या प्रमाणावर होत असुन शिक्षकांना आपआपल्या शाळेवर रोज जावं लागतं. तसं पाहता एक वर्षापासुन ऑनलाईन शिक्षण आहे. शाळेत मुलं नाहीत पण संस्थाचालक शासनाने लॉकडाऊनचे आदेश काढुनही काहीतरी कामाचे निमित्त सांगुन शिक्षक-प्राध्यापकांना शाळा, महाविद्यालयात बोलावतात. दुसरी बाजु प्रत्येक शिक्षक-प्राध्यापकांचं शाळा नाही म्हटलं तरी 25-30 किमी अंतरावर आहे. कारण ही मंडळी तालुका स्तरावर राहतात. मग खेड्यात जावं लागतं. ज्यामुळे शिक्षकापासुन गावात संसर्ग वाढण्याचा धोकाही निर्माण झाला आहे. बिचाऱ्या शिक्षकांना संस्थेच्या आदेशाप्रमाणे नाविलाजास्तव शाळेवर जावं लागतं. शासनाचे आदेश 50 टक्के उपस्थितीचे आहेत पण मुख्याध्यापक, प्राचार्य येण्याची सक्ती करतात. नाविलाजास्तव बिचारे जातात. जिल्हाधिकारी, बीड यांनी शिक्षण संस्थाचालकांना आदेश देण्याची गरज आहे. गरज असेल तर शाळेत बोलवा. गरज नसताना शाळा करणं धोक्याचं असुन बीड जिल्ह्यात कितीतरी शिक्षक, प्राध्यापकांच्या कुटुंबांना धोका झालेला असल्याचे शिक्षक नेते तोंडे म्हणाले.

No comments