Breaking News

प्रेषित पैगंबर यांच्यावर टिका करणाऱ्यावर गुन्हा दाखल करा


जमियत उलमा हिंद व टिपू सुलतान ब्रिगेडची आष्टी तहसीलदार यांच्याकडे  निवेदनाद्वारे मागणी

आष्टी : इस्लाम धर्माचे प्रचारक व पुरस्कर्ते प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्यावर जाणीवपूर्वक टिका करून समाजात जातीय तेढ निर्माण करणाऱ्या नरसिंहनंंद सरस्वती याच्यावर गुन्हा दाखल करावा तसेच त्याला कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी आष्टी येथील जमियत उलमा हिंद व टिपू सुलतान ब्रिगेड यांच्या वतीने शुक्रवारी (ता.१६) आष्टी तहसील व आष्टी पोलीस ठाण्यात निवेदनाद्वारे करण्यात आली.

नरसिंहनंंद सरस्वती या महाराजाने प्रेषित पैगंबर यांच्या विषयी जाणीवपूर्वक व समाजात तेढ निर्माण व्हावा या हेतूने खालच्या पातळीवर जाऊन टिका करून इस्लाम धर्मीयांच्या भावना दुखावल्या आहेत. भारत देश हा शांतिप्रिय देश असुन सर्वधर्म समभावाची शिकवण घेऊन गुण्यागोविंदाने नांदनारा देश आहे. नरसिंहनंद सारखे समाज कंठक लोक स्वतःच्या फायद्यासाठी वाचाळ बोलून देशाच्या एकात्मतेला धोका पोहचविण्याचे काम करत आहेत. मुस्लिम समाजाच्या भावनाचा विचार करून प्रशासनाने अशा समाज कंठकावर कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी दिलेल्या निवेदनात करण्यात आली. यावेळी जमियत उलमा ए हिंदचे आष्टी तालुका अध्यक्ष  मुफ्ती शफिक पठाण, टिपू सुलतान ब्रिगेडचे बीड जिल्हाध्यक्ष डॉ नदीम शेख, हाफिज उमर सहाब, हाफिज अझहर सहाब, नाजीम शेख, तय्यब पठाण आदी उपस्थित होते.

No comments