Breaking News

केज तालुक्यात विविध उपक्रमांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी


गौतम बचुटे । केज 

भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३० व्या जयंती निमित्त केज तालुक्यात विविध सामाजिक उपक्रम राबवून जयंती साजरी करण्यात आली.

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३० व्या जयंती निमित्त केज तालुक्यात विविध सामाजिक कार्यक्रम घेऊन व कोरोनाची सर्व नियम पाळून आंबेडकर जयंती साजरी करण्यात आली. फुले नगर फुलेनगर येथे रक्तदान शिबिर घेण्यात आले. तसेच भीम नगर येथे डॉ. बाबासाहेेब आंबेडकरांच्या पूर्णाकृती पुतळ्याला मानवंदना देण्यात आली. या वेळी संदीपान हजारे, विकास मस्के आणि भीम अनुयायी उपस्थित होते. त्याच बरोबर फुलेनगर येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते आकाश गायकवाड यांनी आंबेडकर यांच्या जयंती निमित्त मास्क वाटप करून अभिवादन केले. तर साळेगाव येथे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष मिसळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यात आले. या वेळी सरपंच कैलास जाधव, उपसरपंच अमर मुळे, सेवा सहकारी सोसायटीचे व्हाईस चेअरमन लिंबाजी बचुटे, रवींद्र जोगदंड, संभाजी सरवदे, रावसाहेब बचुटे, अविनाश सरवदे, रोशन सरवदे, अमित बचुटे यांच्यासह डॉ. आकाश बचुटे, ज्योतिराम बचुटे, पोलीस कर्मचारी अशोक नामदास, दिलीप गीते, हनुमंत गायकवाड, हे उपस्थित होते. 

तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मुख्याध्यापक काळे सर, ग्रामपंचायत मध्ये सरपंच कैलास जाधव आणि शंकर विद्यालयात मुख्याध्यापक प्रवीण देशमुख यांनी ही जयंती साजरी केली. त्याच बरोबर तालुक्यात विविध ठिकाणी शासकीय आणि निमशासकीय कार्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करुन अभिवादन करण्यात आले. दरम्यान या वर्षी कोरोना संकटामुळे कुठेही मिरवणूक निघाली नाही. 

No comments