Breaking News

भविष्यातील पाण्याचे संकट ओळखून आता पाणी बॅंक स्थापन करणे महत्वाचे : जलदुत डॉ. राजेंद्र बंड यांचे प्रतिपादन


बीड :  जमिनीचा ७१ टक्के भूभाग पाण्यात आहे. त्यातील ९७.२४ टक्के पाणी खारे आहे, व २.१४ टक्के पाणी हे बर्फ व हिमनद्याच्या स्वरूपात आहे तर केवळ फक्त ०.६७ टक्के पाणी वापरायचे आहे. त्यामुळे हे लक्षात घेता पुढील येणाऱ्या काळात पाणी टंचाईचा भयंकर सामना प्रत्येकाला करावा लागणार आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात किती तरी अब्ज घन मीटर पाण्याची कमतरता निर्माण होण्याची शक्यता असून भविष्यातील पाणी संकटामुळे जीव सृष्टीला धोका संभावतोय. हे संकट  टाळण्यासाठी आणि पुढच्या पिढीसाठी प्रत्येकाने आतापासूनच "पाणी बँक" स्थापन महत्वाचे असल्याचे प्रतिपादन जलदुत डॉ. राजेंद्र बंड यांनी केले असून सध्या उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन व वितरण केले पाहिजे असं मत ही त्यांनी व्यक्त केलं. 

रविवारी (दि.२५) शिरुर तालुक्यातील आर्वी येथे सोशल डिस्टनसिंगच्या नियमांचे पालन करून आयोजित केलेल्या पाणी परिषदेत ते बोलत होते. यावेळी डॉ. महादेव जगताप, डॉ. पंडित शेंडगे, प्रा. बाळासाहेब मस्के, गोवर्धन मस्के, संभाजी सुर्वे, गणेश मस्के, धनंजय मलेकर, राम साळवे, हरिराम काकडे, अमोल पाठक, ओम हिंदोळे, रमेश मदने, अभिषेक सोळंके, कैलास ओव्हाळ यांची उपस्थिती होती. 

जलदुत डॉ. राजेंद्र बंड यांनी भविष्यातील पाणी टंचाईवर चिंता व्यक्त करून जल हेच जीवन आहे, आणि ते कृती आणि आचारणाला निश्चित दिशा देण्यासाठी जलसाक्षर झाले पाहिजे. त्यासाठी आपण पाणी योग्य सिंचन नियोजन, जल पुनर्भरण, जलप्रदूषण, आणि सांडपाण्याचा पुनर वापर या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत. वाहून जाणाऱ्या पाण्याला अडवले पाहिजे. हे काम लोकसहभागातून झालं पाहिजे. यासाठी सर्व गावकऱ्यांनी एकत्र येवून जिथे पानवटे आहेत, त्यांची देखभाल दुरुस्ती केली पाहिजे. 'पाणी बँक' साठी सर्वांनी पुढाकार घेतला पाहिजे असं मत यावेळी जलदुत डॉ. राजेंद्र बंड यांनी व्यक्त केले. या परिषदेत गावकरी सहभागी झाले होते. 

Zzzzzzzzzzzzz

No comments