Breaking News

चमकोगिरी करणाऱ्या केज मतदार संघातील राजकीय नेत्यांना सोशल मीडियातुन सणसणीत चपराक


कुणी ना कुणाचे भावनेच्या आधारावर राजकीय पोळी भाजून घेणाऱ्या नेत्यांनी संकट काळात तरी मदत करावी

गौतम बचुटे । केज   

केज तालुक्यात कोरोनाचा कहर वाढला आहे सामान्य जनता त्यात होरपळून निघत आहे आणि शासकीय यंत्रणा पूर्ण क्षमतेने काम करीत आहे मात्र केवळ चमकोगिरी करून शेखी मिरविणाऱ्या सर्व पक्ष संघटनांचे कार्यकर्ते मात्र आता गप्प असून केवळ सरकारी यंत्रणेवर बोट ठेवून उणी दुणी काढण्यात धन्यता मानत आहेत यावेळी मात्र मदतीला कुणी पुढे येत नसल्याचे दिसत आहे. यात स्थानिक आमदार, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, नगराध्यक्ष  नगरसेवक ते विविध पक्षांचे पदाधिकारी यांचा समावेश आहे त्यांच्या नाकर्तेपणा बद्दल केज येथील नागरिकांची पोस्ट सोशल मीडियावर चर्चेत आहे, ती पोस्ट पुढील प्रमाणे आहे.

कुणी ना कुणाचे या मथळ्याखाली लिहिलेली पोस्ट अशी आहे.

आज केजमधे जनतेच्या हितासाठी (कल्पनिक) अहोरात्र प्रयत्न करणारे राजकीय पक्ष कॉग्रेस, राष्ट्रवादी कॉग्रेस, भाजप, शेकाप, मनसे, जनविकास, बहूजन विकास आघाडी यांनी या करोनाच्या महामारीत कूणी मदत केली का? सुखामधे असताना जन्मदिवस, लग्न, मयत, सत्यनारायनाची पूजा, मूंज, याला न बोलवीता हजेरी लावणारे हे राजकीय पक्ष गेले कूठे ? यांनी आपाआपल्या नावाने कोवीड हॉस्पीटल सूरु करुन आपले मतदार तरी सांभाळून घ्यावेत.

केजच्या जनतेला या पोस्ट मध्ये असे आवाहन केले आहे की, आपले आवडते राजकीय पक्षाला विनंती करा की, कॉग्रेस हॉस्पीटल, भाजप हॉस्पीटल, राष्ट्रवादी हॉस्पीटल, मनसे हॉस्पिटल, जनविकास हॉस्पीटल , बहूजन विकास आघाडी हॉस्पीटल, वार्डावार्डात अपक्ष हॉस्पिटल या राजकीय पक्षानी जनतेसाठी हॉस्पिटल चालू करा. नाही  तर केज मध्ये  विकासाची नुसती फेकाफेकी करु नका. आज देश फेकाफेकीमधे गारद झाला आहे. तूम्ही तरी केजला फेकू नका आम्ही सजग आहोत. चूकीला माफी नाही. 

No comments