Breaking News

शिरुर शहरासह तालुका पुर्णपणे बंद;माञ माणासांची रहदारी कायम!


शिरूर कासार
: कोरोना या संसर्ग रोगाने राज्यात सर्वत्र हाहाकार माजवला असल्यामुळे राज्यात कडक निर्बंधासह लॉकडाऊन करण्यात आले असून जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने दि.२६ मर्च ते ४ एप्रील पर्यंत बीड जिल्ह्यात कोरोणा रोगाच्या साथीमुळे लाॕकडाऊन करण्यात आले होते.

मात्र ३० तारखेनंतर काही प्रमाणात शिथीलता देण्यात आली. परंतु ४ तारखेला लाॕकडाऊनचा कालावधी संपल्यावर एक दिवस होत नाही तोच परत ३० एप्रिल प्रर्यंत अत्यावश्यक दुकाने सोडता निर्बंध लावण्यात आले.व शनिवार,रविवार दोन दिवस विकेड लाॕकडाऊन करण्यात आला आहे.

याला शहरासह तालुक्यातील नागरीकांनी मोठा प्रतिसाद दिला असून अत्यावश्यक सेवा मध्ये किराणा दुकांनाना परवानगी आसताना सुद्धा व्यापाऱ्यांनी स्व:ताहुन दुकाने बंद केली. तर शनिवारी पहिल्याच दिवशी शहरामध्ये काटेकोरपणे लाॕकडाऊनचे पालन केले.यावेळी मेडीकल सोडता सर्व शटर बंद होते.माञ अनेक वेगवेगळी करणे सांगत नागरिकांची रस्त्यावरची रहदारी हि कायम होती.


दोन दिवस बंद मुळे सामान खरेदी साठी उडाली झुंबड!

कोरोणाच्या पार्श्वभुमीवर महाराष्ट्रासह संपुर्ण बीड जिल्हा हा शनिवार,रविवार दोन दिवस विकेड लाॕकडाऊन करण्यात आला आहे.दोन दिवस बंद राहणार आसल्यामुळे शुक्रवारी किराणा, भाजीपाला, यासह आदींची खरेदी करण्यासाठी झुंबड उडाली होती. शुक्रवारी आठ नंतर लाॕकडाऊनला सुरुवात झाल्यानंतर शनिवारी दिवसभर सगळीकडे शुकशुकाट पाहायला मिळाला.

व्यापाऱ्यांनी स्वतःहुन दुकाने उघडले नाहीत!

शिरुरमध्ये पुर्णपणे लाॕकडाऊन पाळण्यात आला.अत्यावश्यक सेवेमधील किराणा दुकान सुद्धा हे बंद होते. अत्यावश्यक सेवेमधील किराणा दुकान हे चालु ठेवता येते पण व्यापाऱ्यांनी स्वतःहुन दुकाने उघडले नाहीत. त्यामुळे विकेड लॉक डाऊनला व्यापाऱ्यांचा प्रतिसाद असल्याचे निदर्शनात आले आहे.

-श्रीराम बेंडे - तहसीलदार,शिरूर कासार.

....तर व्यापारी संभ्रमात!

लाॕकडाऊनमुळे नेमके बंद काय ? अण चालु काय ? याचाच ताळमेळ लागत नसल्यामुळे व्यापारी संभ्रमात असल्याचे या परीस्थितीवरुन दिसुन येत होते.

विकेड लाॕकडाऊनच्या पार्श्वभुमीवर शिरुर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक डाॕ.रामचंद्र पवार यांनी तालुक्यातील बंहुताश गावामध्ये जाऊन प्रत्यक्ष भेट देऊन परीस्थीतीची पाहणी केली.चौका-चौकामध्ये पोलीस उभा करण्यात आले होते.यावेळी ग्रामीण भागामध्ये सुद्धा लाॕकडाऊनला चांगला प्रतिसाद मिळाला आसल्याचे पवार यांनी सांगितले. 


No comments