Breaking News

आष्टी येथे ट्रामा केअर सेंटरमध्ये आॕक्सीजन प्लांट सुरु करावा : माजी आ.भीमसेन धोंडे


महेश हाॕस्पीटलला  कोव्हिड सेंटरची परवानी दिल्यास चालविण्यास तयार

आष्टी : १५ दिवसांपासून आष्टी तालुक्याची कोरोनाबाधीतांची संख्या तीन अंकी होत आहेच परंतु पाटोदा व शिरूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात रुग्ण वाढत असल्याने या मतदार संघात रेमडिसीवीर इंजेक्शन,वॅक्सीन पुरेशा प्रमाणात तर उपलब्ध करून द्यावीच पण येथे आॕक्सीजन निर्मिती प्रकल्पाला मंजूरी देण्यासाठी आपण राज्याचे मुख्यमंञी उध्दव ठाकरे ,आरोग्य मंत्री राजेश टोपे,विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस,पालकमंत्री धनंजय मुंडे,माजी पालकमंत्री पंकजाताई मुंडे यांच्याकडे मागणी केली आहे. सध्या सर्वत्र या  रेमडिसीवीर या इंजेक्शनचा मोठ्या प्रमाणात काळाबाजार सुरु आहे. हे इंजेक्शन १० ते २० हजार रुपयाला विकले जाते असल्याची माहिती भाजपचे जेष्ठ नेते माजी आ.भीमसेन धोंडे यांनी दिली.

          आष्टी येथील पं.जवाहरलाल नेहरू विद्यालयाच्या कार्यालयात आज रविवार दि.१८ एप्रिल रोजी सांयकाळी आयोजित करण्यात आलेल्या पञकार परिषदेत माजी आ.भीमसेन धोंडे बोलत होते. यावेळी शेतकरी शिक्षण संस्थेचे जेष्ठ संचालक विठ्ठलआण्णा बन्सोडे उपस्थित होते.

          पुढे बोलतांना माजी आ.भीमसेन धोंडे म्हणाले की,सध्या बीड जिल्ह्यात कोरोना बाधीतांचा अकडा दररोज एक हजाराच्या पुढे आहे.आष्टी तालुक्यातही तीन अंकी कोरोना बाधीतांची संख्या झपाट्याने वाढत आहे.ब-याच कोरोना रूग्णांना उपचारासाठी बेड शिल्लक मिळत नाहीत आणि मिळाले तर आॕक्सीजन अभावी त्यांना आपले प्राण गमवावा लागत आहे.सध्या कोरोनाची भयान परिस्थिती निर्माण झाल्याने आष्टी,पाटोदा व शिरूर तालुक्यात प्रशासनाने मोठ्या प्रमाणावर रेमडिसीवीर  इंजेक्शन आणि लसही जास्त उपलब्ध करून देणे गरजेचे आहे.आष्टी हे बीड जिल्ह्यापासून १०० कि.मी. तर अंबाजोगाईपासून १५० कि.मी आहे त्यामुळे या तिन्ही तालुक्यातील कोरोनाबाधितांना उपचार घेऊन जाईपर्यंत त्यांना जीव गमवावा लागतो.याचा विचार करून जसा अंबाजोगाई येथे आॕक्सीजन निर्मिती प्रकल्पाला मंजूरी दिली आहे.तशीच मंजूरी आष्टी तालुक्यात द्यावी अशी मागणी आपण राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे,उपमुख्यमंञी अजित पवार, विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस, पालकमंञी धनंजय मुंडे,माजी पालकमंञी पंकजा मुंडे, जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांच्याकडे  निवेदनाद्वारे मागणी केली असल्याचेही भाजपनेते माजी आ.भीमसेन धोंडे यांनी केली.

परवानगी द्या.२०० बेडचे कोव्हीडसेंटर चालवू

सध्या आष्टी तालुक्यात मोठ्या प्रमाणावर कोरोनारूग्ण वाढत आहे.कोरोना  बाधितांना उपचार घेण्यासाठी बेड कमी पडत आहेत परंतु जर उपचारासाठी बेड कमी पडत असेल तर आपण बीडचे  जिल्हाधिकारी यांनी परवानगी दिली तर आनंद चॅरीटेबलच्यावतीने २०० बेडचे कोवीड सेंटर चालविणार असल्याचेही माजी आ.भीमसेन धोंडे यांनी यावेळी सांगितले.

No comments