Breaking News

अजय कोमटवार यांच्या नेतृत्वाखाली ग्रामपंचायतने केले जलसमाधी आंदोलन


प्रशासनाच्या लेखी आशवसाने आंदोलन सोडले

बाबासाहेब देशमान । दिंद्रुड

 माजलगाव तालुक्यातील दिंद्रुड ग्रामस्थांनी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न प्रशासनाकडुन सुटत नसल्याने बुधवारी सकाळी जलसमाधी आंदोलन करण्यात आले.  तब्बल दोन तास आंदोलन कर्ते पाण्यात ठाण मांडून बसले होते.   १८ ते २० हजार जनसंख्या असलेल्या दिंद्रुड गावाला येथुन ३ किमी अंतरावर असलेल्या चाटगांव शिवारातील तलावातून पाणी पुरवठा होतो. सद्यपरिस्थितीत या तलावात केवळ १७.२ टक्के जिवनसाठा उपलब्ध आहे. 

वेळीच पाणी आरक्षित नाही केल्यास पुढील महिन्यात दिंद्रुड करांना पाण्यासाठी वणवण भटकण्याची वेळ येण्याची शक्यता नाकारता येत नाही या साठी  सरपंच अजय कोमटवार यांच्या नेतृत्वाखाली  ग्रामपंचायत सदस्यांनी धारुर तालुक्यातील चाटगांवच्या तलावातून अवैद्यरित्या सुरु असलेल्या पाणी उपसा व येत्या काही दिवसांत दिंद्रुड साठी निर्माण होणाऱ्या खंडीत पाणीपुरवठा यामुळे पाणी आरक्षित करण्यात यावे व अवैद्यरित्या चालु असलेल्या पाणी उपसाकरणार्या विद्युत पंपावर कारवाई करण्याची धारुर प्रशासनाला जवळपास दिड महिन्यापुर्वीपासून मागणी केली होती. धारुर तहसील कुठलीही दखल न घेतल्या मुळे बुधवारी  ग्रामपंचायत सरपंच व सदस्यांनी तलावात जलसमाधी आंदोलन केले. सदस्य अतुल चव्हाण, भारत गौंडर,नारायण चांदबोधले, राम उबाळे,रमेश शिंदे, मिलींद देशमाने, भाऊ सुरवसे, हनुमान सोळंकेे आदी  कर्मचारी पाण्यात उतरले होते. 


Zzzzzzzzzzzzz

धारुर तहसील चे नायब तहसीलदार प्रकाश गोरड यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेत, समिती स्थापन करित योग्य ती कारवाई करण्याची हमी दिली. वरिष्ठांच्या आदेशानुसार लेखी कारवाई च्या अश्वासनानंतर  आंदोलन मागे घेतले. चाटगाव तलावात भरपूर प्रमाणात पाणीसाठा शिल्लक असून दिंद्रुड ग्रामस्थांना पाणी कमी पडणार नाही. दिंद्रुडकरांची आम्ही वाताहत होऊ देणार नाहीत. 

- बालासाहेब केकान, सरपंच ग्रामपंचायत चाटगाव.

दिंद्रुड गावाच्या लोकसंख्येच्या मानाने पाणी पुरवठा बंद होऊ नये म्हणून चाटगावकरांनी साथ देत ग्रामपंचायत ला सहकार्य करावे आणि दिंद्रुड ग्रामस्थांची तहान भागवावी- 

अजय कोमटवार सरपंच ग्रामपंचायत दिंद्रुड.

No comments