Breaking News

दिवंगत पत्रकार दादासाहेब बन यांना श्रद्धांजली


गौतम बचुटे । केज  

दिवंगत पत्रकार दादासाहेब बन यांना आदर्श पत्रकार संघाच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

 या बाबतची माहिती अशी की, दिवंगत पत्रकार दादासाहेब बन यांचे काही दिवसांपूर्वी दुःखद निधन झाले. असून त्यांचा परिवार व कुटुंब उघड्यावर आले आहे त्या निमित्त आदर्श पत्रकार संघाच्या वतीने दि. ४ एप्रिल रविवार रोजी केज येथील शासकीय विश्रामगृहावर त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. या प्रसंगी आदर्श पत्रकार समितीचे अध्यक्ष अशोक सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली आणि ज्येष्ठ पत्रकार प्रा. हनुमंत भोसले, शिवदास मुंडे, धनंजय कुलकर्णी, धनंजय देशमुख, दशरथ चवरे, सचिव गौतम बचुटे, उपाध्यक्ष महादेव काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत श्रध्दांजली व शोकसभा आयोजित करून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

No comments