Breaking News

सर्वसामान्यांवर उपासमारीची वेळ आणणारा लॉकडाऊनचा निर्णय रद्द करा- निळकंठ चाटे


परळी : कोरोना प्रादुर्भावाच्या कालावधीत कडक उपाययोजना करुन त्याची अंमलबजावणी करण्यास अपयशी ठरलेल्या जिल्हा प्रशासनाने लॉकडाऊन लावुन हातावर पोट असणार्या मजुर व छोट्या व्यापार्यांवर उपासमारीची वेळ आणली आहे.जिल्हा प्रशासनाने डोके ठिकाणावर ठेवुन निर्णय घ्यावेत अन्यथा व्यापारी व नागरीकांचा उद्रेक झाल्याशिवाय राहणार नसल्याचे भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष निळकंठ चाटे यांनी म्हटले असुन जिल्हा प्रशासनाने सर्वसामान्यांना त्रास होणार नाही असे निर्णय घ्यावेत याबाबत भाजपा राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे व खा.डॉ.प्रितमताई मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा प्रशासनाबरोबर चर्चा करणार असल्याचे चाटे यांनी सांगितले.

  महाराष्ट्रात कोरोनाचे रुग्ण अनेक पटीने वाढत असले हे जरी खरे असले तरी कोरोना रोखण्यासाठी सॅनिटायझरींग,मास्कचा वापर,गर्दी टाळणे अशा उपाययोजना करुन त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करता आली असती परंतु प्रशासकीय यंत्रणा सुस्त असल्याने कोरोना रोखण्यात येत असलेले अपयश नागरीकांच्या माथी मारुन केवळ कागदी घोडे नाचवत जिल्हा प्रशासनाकडुन दररोज नवनविन आदेश काढण्यात येत आहेत.

सर्वसामान्य व्यापारी व नागरीकांना अकलनाबाहेर असलेल्या या आदेशामुळे जिल्हा प्रशासन इंग्रजी राजवटीपेक्षा जुलमी वाटत आहे.बीड जिल्हाधिकार्यांनी सोमवारी रात्री काढलेल्या नविन आदेशामुळे जिल्ह्यातील छोटे व्यापारी व मोलमजुरी करणार्या नागरीकांवर उपासमारीची वेळ आल्याने या आदेशाला तीव्र विरोध होत आहे.यापेक्षा जिल्हा प्रशासनाने पुर्वी सुरु असलेले सकाळी 7 ते 1 व्यवहार सुरु असलेले व्यवहार पुन्हा सुरु ठेवण्याचे आदेश पुन्हा द्यावेत तसेच प्रशासनाने कोरोना प्रसाराचा बारकाईने अभ्यास करुन आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात अन्यथा जिल्हा प्रशासनाच्या विरोधात मोठा उद्रेक होईल त्यावेळी परिस्थिती हाताबाहेर गेली तर यास जबाबदार जिल्हा प्रशासनच राहणार असल्याचा आरोप भाजयुमो जिल्हाध्यक्ष निळकंठ चाटे यांनी केला आहे. 

No comments