Breaking News

यशोदिप भोजनालय तर्फे चालविण्यात येणाऱ्या शिव भोजन केंद्रा तर्फे आष्टी शहरात घरपोच ७५ थाळी मोफत वाटप


आष्टी : राज्य शासनाने 14 एप्रिल च्या रात्रीपासून संचारबंदी लागू केली आहे. यामुळे अनेकांवर रोजगारी चे संकट आले आहे त्यामुळे एक वेळच्या जेवणाची देखील भ्रांत होत असल्याचे चित्र दिसत आहे. मात्र शिव भोजन थाळीच्या माध्यमातून आष्टी शहरात 75 जणांना शिव भोजन थाळी मोफत दिली जात आहे.  

शासनाकडून आष्टी येथील यशोदीप भोजनालय येथे शिवभोजन केंद्राची स्थापना केली आहे या  शिव भोजन केंद्रा तुन आष्टी शहरात दररोज 75 जणांना या मोफत शिव भोजनाचा लाभ भेटणार आहे असे केंद्र चालक बापुराव सिंदनकर यांनी सांगितले आहे राज्य शासनाच्या निर्णयानुसार संचारबंदी काळात मोफत शिवभोजन थाळी दिली जाणार आहे यामध्ये घरपोच व केंद्रावर वाटप करण्याची परवानगी जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी दिली आहे त्याप्रमाणे आज आष्टी शहरात घरपोच 75 थाळी चे वाटप केंद्र चालक  बापुराव सिंदनकर, डॉक्टर गणेश पिसाळ, डॉक्टर शामगिरे ,शेरुभाई नगरसेवक यांच्या हस्ते गरजुंना वाटप करण्यात आले.

No comments