Breaking News

रुग्णाचा मृत्यू : संतप्त नातेवाईक- डॉक्टरमध्ये फ्री स्टाईल हाणामारी


बीड मधील खासगी रुग्णालयातील प्रकार 

आशिष सवाई । बीड  

शहरातील जालना रोडवर असलेल्या माऊली कोविड केअर हॉस्पिटलमध्ये वडीलांचे निधन झाल्यानंतर संतप्त झालेल्या नातेवाईकांनी डॉक्टराना विचारणा केली असता उडवाउडवीची उत्तरे दिल्याने सातपलेल्या डॉक्टर आणि नातेवाईक यांच्यामध्ये फ्रिस्टाईल हाणामारी झाली .घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि तहसीलदार घटनास्थळी दाखल झाले आणि प्रकरण शांत केले.

  

गोरख शिंदे यांच्या वडिलांवर माऊली रुग्णालयात उपचार सुरू होते,रविवारी दुपारनंतर त्यांचे निधन झाले .यानंतर संतप्त झालेल्या रुग्णाच्या नातेवाईकांनी डॉक्टर यांना जाब विचारण्याचा प्रयत्न केला .मात्र डॉक्टर यांनी दुरुत्तरे दिल्याने नातेवाईक अधिकच संतापले आणि वातावरण गरम झाले,त्यानंतर रुग्णालयातच हाणामाऱ्या झाल्या .या घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि तहसीलदार हे घटनास्थळी दाखल झाले .त्यानंतर रुग्णालय परिसरात जमलेला जमाव पंगवून प्रकरण मिटवण्यात आले. 

माऊली हॉस्पिटलमध्ये सध्या कोविड रुग्णांवर उपचार केले जातात मात्र या ठिकाणी अपुऱ्या सोयी सुविधा,अस्वच्छता ,नातेवाईकांना दिली जाणारी अपमानास्पद वागणूक यामुळे रुग्णालय नेहमीच चर्चेत असते .आज या घटनेने पुन्हा एकदा त्यात भर पडली आहे. 

No comments