Breaking News

केज तालुक्यात तुरीचे भुस्कट जाळण्यावरून एकाला मारहाण : पाच जणांविरुद्ध ॲट्रॉसिटी दाखल

गौतम बचुटे । केज 

केज तालुक्यातील मस्साजोग येथे संगनमत करून शेतातील तुरीचे भुस्कट जाळून नुकसान केले व मारहाण केली. या कारणा वरून केज पोलीस ठाण्यात पाच जणांच्या विरोधात ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या बाबतची माहिती अशी की, केज तालुक्यातील मस्साजोग येथे दि. २८ एप्रिल मंगळवार रोजी पहाटे ५:०० वा. च्या सुमारास अशोक भगवान सोनवणे यांच्या शेतातील तुरीचे भुस्कट नारायण सखाराम धस, परमेश्वर नारायण धस, आशोक नारायण धस, वैजनाथ भागवत धस, रामेश्वर भागवत धस हे सर्व रा. सांगवी ता. केज यांनी संगनमत करून जाळून नुकसान केले. या विषयी अशोक सोनवणे यांनी त्यांना विचारले असता उलट त्यालाच जातीवाचक शिवीगाळ करून मारहाण केली. 

तसेच त्याच्या घरी जाऊन कुटुंबीयांना काठीने मारहाण करून जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या. या प्रकरणी अशोक भगवान सोनवणे यांच्या तक्रारी वरून नारायण सखाराम धस, परमेश्वर नारायण धस, आशोक नारायण धस, वैजनाथ भागवत धस,  रामेश्वर भागवत धस सर्व रा. सांगवी ता. केज यांच्या विरुद्ध केज पोलीस ठाण्यात दि. २८ एप्रिल रोजी अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायदा (ॲट्रॉसिटी) सह साथ रोग प्रतिबंधक कायदा, मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी गु. र. नं. २१२/२०२१ भा. दं. वि. ४२७, १४३, १४७, १४९, ३२३,५०६ आणि अ.जा.ज. प्र. कायदा कलम ३ (१) (आर) (एस) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याचा तपास उपविभागीय पोलिस अधिकारी भास्कर सावंत हे करीत आहेत. 

No comments