Breaking News

माझे गाव माझी जबाबदारी' या माध्यमातून बीड तालुक्यातील सर्वपक्षीय युवकांनी पुढाकार घेवून आपल्या गावात कोरोना हद्दपार करण्यासाठी जनजागृती करावी - रमेश पोकळे


बीड :  तालुक्यातील  बहुतांश गावात कोरोना संसर्ग वाढत चाललेला आहे. या संदर्भात सर्व गावातील  युवकांनी पुढाकार घेऊन घरोघरी जावून आजारा संदर्भात विनाकारण निर्माण झालेली भिती व लक्षणे असल्यास तातडीने घ्यावयाची काळजी या संदर्भात जनजागृती करणे  आवश्यक आहे. गावातील चौकात/ मंदिरात/ चावडीवर बसणे टाळणे आवश्यक आहे. तंबाखू व गोवा/ मावा / धुम्रपान करून सार्वजनिक ठिकाणी थुंकण्यास प्रतिबंध करावा लागेल. कौटुंबिक कार्यक्रमात किवा धार्मिक सोहळ्यात गर्दी करू नये म्हणून कडक उपाय योजना कराव्याच लागतील.

तसेच आपल्या गावातील 18 वर्षा च्या पुढील सर्व बंधू भगिणी व युवक मिञांची लसीकरण मोहिमेसाठी ऑनलाईन नोंदणी करून घेण्यासाठी नियोजन करावे लागेल. या संकटाचा सामना करण्यासाठी आपण सर्वानीच पक्षीय भुमिका बाजुला ठेवून आपल्या गावासाठी एकञ येवून कोरोना ला हद्दपार करण्यासाठी "माझे गाव माझी जबाबदारी" या माध्यमातून  जनजागृती मध्ये सहभाग घ्यावा व व्यापक चळवळ निर्माण करावी असं आवाहन अटलजनसेवक  रमेश पोकळे यांनी केलं आहे.


No comments